Sat, Aug 24, 2019 22:03होमपेज › Sangli › मला आमदारकी नको; खासदारच राहणार 

‘कोणी काहीही म्हणोत, आमदारकीत रस नाही’

Published On: Jun 26 2018 8:23PM | Last Updated: Jun 26 2018 8:23PMमांजर्डे : वार्ताहर

जिल्ह्यातील जनतेने मला खासदार म्हणून निवडून दिले आहे.त्यांच्यासाठी केंद्रातून मोठ्या प्रमाणात निधी आणणे शक्य आहे. त्यामुळे मला आमदारकीमध्ये रस नाही. मी पुन्हा खासदारच होणार आहे, अशी घोषणा कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष खासदार संजय पाटील यांनी केली. ते गौरगाव (ता. तासगाव) येथे एका कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमात व्यासपीठावरील सर्वपक्षीय नेतेमंडळींमध्ये राजकीय कलगीतुरा चांगलाच रंगला. 

खासदार पाटील म्हणाले, मला खासदार होऊन चार वर्षे झाली. या काळात केंद्र व राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी आणण्यात यश आले आहे. राष्ट्रीय महामार्ग, सिंचन योजना यांच्यासाठी कोट्यवधी  रुपयांचा निधी आणला आहे. केंद्राकडून सिंचन योजनांसाठी आवश्यक निधी आणून पुढील एक वर्षांच्या आत शेतकर्‍याच्या बांधापर्यंत पाणी देणार आहे. सरकारने यासाठी  शक्य आहे तेवढी मदत केली असल्याचे त्यांनी सांगितले.

कोणी काहीही म्हणू देत,पण आमदार होण्यात मला रस नाही. मी खासदारच होणार आहे, असे सांगत त्यांनी पुढील निवडणुकीत मी लोकसभा निवडणूकच लढविणार असल्याचे संकेत दिले. राष्ट्रवादीचे नेते दिनकर पाटील यांनी आमदार अनिल बाबर व खासदार संजय पाटील यांच्यातील वाद मिटवून दोघांनी हातात हात घालून काम करावे, असे सांगितले.माजी नगराध्यक्ष वैभव पाटील म्हणाले, पाटील आणि देशमुख यांचे सर्व काही ठरवून असते. त्याला फक्त मागील विधानसभा निवडणूक अपवाद होती.  एकदाचा टेंभू योजनेचा विषय मिटवून टाकण्याचीही त्यांनी मागणी केली. यावेळी अविनाश पाटील, प्रमोद शेंडगे, हर्षवर्धन देशमुख, सुभाष पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सचिन पाटील यांनी स्वागत केले. 

अविनाश चव्हाण, अनिल पाटील, गणेश खराडे, अलंकार निकम, राहुल पाटील, गणपतराव मोहिते, शिवाजी मोहिते, नागेश मोहिते उपस्थित होते. खासदार पाटील यांची कृष्णा खोरे विकास मंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार केला.  मांजर्डे येथील धनश्री बाळासाहेब भगत हिने पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत राज्यात 6 वा क्रमांक मिळविल्याबद्दल खासदार पाटील यांच्याहस्ते तिचा सत्कार झाला.