Thu, Jun 20, 2019 21:47होमपेज › Sangli › पाहुणा ते नेता ही राष्ट्रवादीची संस्कृती : निशिकांत भोसले-पाटील 

पाहुणा ते नेता ही राष्ट्रवादीची संस्कृती : निशिकांत भोसले-पाटील 

Published On: Jul 08 2018 1:45AM | Last Updated: Jul 07 2018 8:58PMइस्लामपूर : वार्ताहर

पाहुणा ते नेता ही वाळवा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संस्कृती आहे. तर कार्यकर्ता ते नेता ही देशातील भाजप पक्षाची संस्कृती आहे. भाजपने सत्तेच्या माध्यमातून सर्वसामान्यांचा विकास साधला, तर विरोधकांनी कार्यकर्ते आणि सर्वसामान्यांना विकासाच्या प्रवाहात कधी आणले नाही, असे प्रतिपादन नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनी केले.     

इस्लामपूर शहरातील भारतीय जनता पक्षाच्या युवा कार्यकारणीची निवड करण्यात आली. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी  माजी आमदार भगवानराव साळुंखे होते.  चंद्रशेखर तांदळे यांची इस्लामपूर शहराच्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. निशिकांत पाटील म्हणाले, भारतीय जनता पक्ष हा एक विचार घेवून काम करीत आहे. या पक्षाच्या पाठीशी सर्वसामान्यांपासून उच्चवर्गापर्यंत सर्व स्तरातील लोक आहेत. युवा पिढीची मोठी ताकद पक्षाबरोबर आहे. युवकांनी पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या विकासासाठी एकत्र येवून एका विचाराने काम करावे. 

माजी आमदार भगवानराव साळुंखे म्हणाले, निशिकांत पाटील यांच्या रूपाने भारतीय जनता पक्षाला एक सुसंस्कृत सक्षम असे नेतृत्व मिळाले आहे. त्यांचे नेतृत्व त्यांचे विचार हे आपल्या तालुक्यातील जनतेला विकासाच्या प्रवाहात आणणारे आहेत. त्यांच्या विचाराने तालुक्यातील भारतीय जनता पक्षाची ताकद निश्‍चित वाढली आहे.वाळवा तालुका भाजपचे अध्यक्ष प्रसाद पाटील, युवा मोर्चाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, इस्लामपूर शहर अध्यक्ष अशोकराव खोत, भाजपाचे संघटक धैर्यशील मोरे, नंदकुमार कुंभार, यांनी मनोगत व्यक्‍त केले. 
राजकुमार पाटील,  विकास पाटील, सुभाष शिंगण, महादेव करे, यदुराज थोरात, अमित कदम, अजित पाटील, संजय हवलदार, विजय हुबाले, रियाज पटेल, अजित मटकरी उपस्थित होते.

कार्यकारिणी अशी...

भाजप युवा मोर्चाची शहर कार्यकारिणी अशी ः  चंद्रशेखर तांदळे शहराध्यक्ष.   अंकित कांबळे, अर्जुन पाटील, अभिजित वीरकर,  प्रवीण परीट,  सुरज पाटील, कल्याणी भांडारकर, अनंत दीक्षित सरचिटणीस, विजय बनसोडे, राहुल राठोड, सागर जाधव, माहेश्‍वरी करे, रोहन कारंजकर, रोहित यादव, केतन पोरवाल, प्रदीप क्षीरसागर, मिलिंद माळी  यांच्यासह 52 युवकांची सदस्यपदी निवड करण्यात आली. यावेळी निवडीचे पत्र सर्व पदाधिकार्‍यांना प्रमुख मान्यवरांच्याहस्ते देण्यात आले.