Tue, Mar 19, 2019 05:54होमपेज › Sangli › आटपाडीत एस.टी. बसखाली सापडून निंबवडेची महिला ठार

आटपाडीत एस.टी. बसखाली सापडून निंबवडेची महिला ठार

Published On: Feb 15 2018 1:58AM | Last Updated: Feb 14 2018 11:19PMआटपाडी : प्रतिनिधी 

येथे  ग्रामीण रुग्णालया समोर थांबलेल्या एस.टी. बससमोरुन जाताना चाकाखाली सापडून श्रीमती हनिफा रसूल तांबोळी (वय80, रा.निंबवडे) ही  वृध्दा ठार झाली.

ग्रामीण रुग्णालयासमोर आटपाडी-निंबवडे ही बस  ( एम.एच.10-8386  ) थांबली होती. या बसच्या पुढील बाजूने ही महिला चालली होती. प्रवासी उतरल्यानंतर बस निंबवडेकडे निघाली असता चालकाला समोरुन जाणारी महिला दिसली नाही. यामुळे बस महिलेच्या अंगावरुन गेली. 

याबाबत सौ. साजिया सुलेमान तांबोळी यांनी फिर्याद दिली.आटपाडी आगारातील एस.टी. चालक सचिन बळवंत जाधव (रा.पात्रेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक नंदकुमार सोनवलकर तपास करीत आहेत.