Mon, Sep 24, 2018 10:06होमपेज › Sangli › निमणीतील महिलेच्या खुनातील फरारी संशयितास अटक

निमणीतील महिलेच्या खुनातील फरारी संशयितास अटक

Published On: Sep 11 2018 1:41AM | Last Updated: Sep 10 2018 11:51PMसांगली : प्रतिनिधी

निमणी (ता. तासगाव) येथे एका मतिमंद महिलेचा बोथट हत्याराने खून करून तिच्या अंगावरील कपडे जाळून पसार झालेल्यास स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली. सिद्राम ऊर्फ सिद्धू धोंडीराम देवकुळे (वय 40, रा. निमणी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. गेल्या आठ वर्षांपासून खुनाच्या गुन्ह्यात तो पसार झाला होता. त्याला तासगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

दि. 7 जुलै 2010 रोजी सिद्रामने एका मतिमंद महिलेचा बोथट हत्याराने वार करून खून केला होता. खून केल्यानंतर त्याने त्या महिलेच्या अंगावरील कपडेही जाळून टाकले होते. घटनेनंतर तो पसार झाला होता. सोमवारी तो निमणी (ता. तासगाव) येथील घरी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांना मिळाली होती. त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार सोमवारी दुपारी त्याला सापळा रचून त्याच्या घरातच पकडण्यात आले.