Tue, Dec 10, 2019 14:22होमपेज › Sangli › विजापूर येथे अपघातात मिरजेतील नवदाम्पत्य ठार

विजापूर येथे अपघातात मिरजेतील नवदाम्पत्य ठार

Published On: Dec 26 2017 1:34AM | Last Updated: Dec 25 2017 11:25PM

बुकमार्क करा

मिरज : शहर प्रतिनिधी

कर्नाटकातील विजापूर येथे दुचाकीचा अपघात झाल्याने मिरजेतील नव दाम्पत्य ठार झाले. इम्रान शब्बीर जमखानवाले (वय 23), सारा इम्रान जमखानवाले (वय 21, रा. कृष्णाघाट रस्ता, सहारा कॉलनी, मिरज) अशी मृतांची नावे आहेत. रविवारी रात्री हा अपघात झाला. 

इम्रान हा रिक्षाचालक होता. त्याने साराशी पंधरा दिवसांपूर्वी विवाह केला होता. सारा ही विजापूर जिल्ह्यातील गुलबर्गा येथील राहणारी आहे. इम्रान हा रविवारी साराला दुचाकीवरून सासरी सोडण्यासाठी गेला होता. रात्री दोघेही विजापूरपासून काही अंतरावर असणार्‍या एका गावाजवळ पोहोचले होते. तेथे त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. हा अपघात झाल्याचे समजताच त्यांचे नातेवाईक गुलबर्गा येथे गेले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. त्यांच्या दुचाकीला कोणते वाहन धडकले हे मात्र समजले नाही.