सांगली : लाच घेताना नाटोलीच्या तलाठ्यास पकडले

Last Updated: Jun 01 2020 7:55PM
Responsive image


सांगली : पुढारी वृत्तसेवा 

नाटोली (ता.शिराळा) येथे जमिनीच्या सर्वेनंबर व सातबारा दुरुस्तीसाठी येथील तलाठी भगवानसिंग व्यंकटसिंग राजपूत (वय ३०) याला दोन हजार रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले.

अधिक वाचा : शिराळा : ८१ वर्षाच्या वृद्धाला कोरोना; मणदूर गावात शुकशुकाट

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेली महिती अशी, तक्रारदार यांच्या वडिलांच्या नावे नाटोली या ठिकाणी शेतजमीन आहे. तर तक्रारदार यांच्या वडिलांनी तलाठी कार्यालय नाटोली या ठिकाणी शेत जमीनच्या सर्व्हेनंबर व सातबारा मधील चूक दुरुस्त करण्यासाठी अर्ज केला होता. परंतु, सदरची चूक दुरूस्ती करून सातबारा उतारा देण्याकरीता राजपूत यांनी पाच हजार रुपयांची मागणी केली होती. याबाबत तक्रारदार यांनी १ जून रोजी लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार विभागाच्या कार्यप्रणालीप्रमाणे पडताळणी केली असता त्यामध्ये राजपूत यांनी तक्रारदार यांच्याकडे प्रथम ५००० हजार रूपयांची मागणी करून चर्चेअंती ४००० हजार रूपयावर वर तडजोड करण्यात आली होती. त्यापैकी २००० हजार रूपये लागलीच घेवून येण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर लाचलुचपत विभागामार्फत नाटोलीतील तलाठी कार्यालयत सापळा रचण्यात आला. यावेळी भगवानसिंग व्यंकटसिंग राजपूत यास तक्रारदार यांच्याकडून २००० हजार रूपये लाच स्विकारताना रंगेहात पकडण्यात आले. भगवानसिंग राजपूत यांच्या विरुध्द शिराळा पोलिस ठाण्यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. 

अधिक वाचा : रेठरेहरणाक्ष येथे तोतया अभियंता जेरबंद

सदरची कारवाई राजेश बनसोडे, पोलिस उपआयुक्त, पोलिस अधीक्षक, श्रीमती सुषमा चव्हाण, पोलिस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली, गुरूदत्त मोरे पोलिस निरीक्षक व प्रशांत चौगुले पोलिस निरीक्षक तसेच पोलिस कर्मचारी अविनाश सागर, रवींद्र धुमाळ, संजय कलकुटगी, संजय संकपाळ, राधिका माने, सिमा माने, चालक बाळासाहेब पवार यांनी केली आहे.

अधिक वाचा : मान्सून पूर्व पावसाने वाळव्यातील शेतकरी सुखावला 

सोनिया गांधींकडून मोठा निर्णय! गुजरात काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी हार्दिक पटेल यांची वर्णी!


राज्यात कोरोनाबाधितांचा आजवरचा विक्रम मोडीत


सांगली झेडपीचे जितेंद्र डुडी नवे 'सीईओ'


मुंबई मनपाचे सहाय्यक आयुक्त अशोक खैरनार यांचे कोरोनाने निधन


कोरोना : राज्यात १ लाख ६४ हजार गुन्हे दाखल


कोल्हापूर : परितेत कोरोनाबाधित सापडल्याने भोगावती परिसर हादरला


पुण्यात निर्णयांचा धडाका सुरुच; मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांची तडकाफडकी बदली!


शाळेतून पुस्तके गणवेश खरेदी करण्याची सक्ती केल्यास गुन्हे दाखल करा : मंत्री बच्चू कडू


औरंगाबाद : रस्त्यालगतच्या ५१ निराश्रीतांना आसरा


ठाणे जिल्हा १९ जुलैपर्यंत लॉकडाऊन