होमपेज › Sangli › जिल्ह्याचे लक्ष राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष निवडीकडे

जिल्ह्याचे लक्ष राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष निवडीकडे

Published On: Apr 29 2018 2:07AM | Last Updated: Apr 29 2018 12:09AMसांगली : प्रतिनिधी

राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी रविवारी पुण्यात पक्षाचे प्रमुख नेते, प्रदेश प्रतिनिधी, सर्व जिल्हाध्यक्षांची बैठक होत आहे. प्रदेशाध्यक्षपदी आमदार जयंत पाटील यांच्या निवडीचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. यापूर्वी सांगली जिल्ह्यातील  आर. आर. पाटील  यांना सन 2008 मध्ये राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष पदाची संधी मिळाली होती. जिल्ह्याचे लक्ष या निवडीकडे लागले आहे.

राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष निवडीसंदर्भात राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, सुनील तटकरे, दिलीप वळसे-पाटील, प्रफुल्ल पटेल, विधानसभेतील राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची रविवारी दुपारी एक वाजता पुण्यात बैठक होणार आहे. प्रदेशाध्यक्ष निवडीसंदर्भात या बैठकीत चर्चा होईल. शरद पवार निर्णय घेतील. त्यानंतर पक्षाचे प्रदेश प्रतिनिधी, पक्षाचे सर्व जिल्हाध्यक्ष यांच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष निवडीवर शिक्कामोर्तब होईल. 

आमदार  पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड होईल, असे स्पष्ट संकेत आहेत. पाटील हे विधानसभेतील राष्ट्रवादीचे गटनेते आहेत. पक्षाचे ज्येष्ठ व अभ्यासू नेते आहेत. शेतकरी कर्जमाफीसाठी राष्ट्रवादीने राज्यभर काढलेल्या संघर्ष यात्रेत त्यांचा महत्वाचा सहभाग होता. हल्लाबोल यात्रेतही जयंत पाटील यांनी ठसा उमटविला आहे. आक्रमक भाषणांद्वारे त्यांनी केंद्र व राज्यातील भाजप सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली. 

Tags : Sangli, Nationalist State President, Selection issue,