Tue, Apr 23, 2019 19:36होमपेज › Sangli › राष्ट्रवादी मनपा निवडणुकीचे रणशिंग आज फुंकणार

राष्ट्रवादी मनपा निवडणुकीचे रणशिंग आज फुंकणार

Published On: May 09 2018 1:56AM | Last Updated: May 08 2018 11:37PMसांगली : प्रतिनिधी

आमदार जयंत पाटील यांची राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बुधवारी सायंकाळी 5 वाजता सांगलीत स्टेशन चौकात सत्कार व जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस सांगली महापालिकेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहे. 

‘महापालिका निवडणुकीत आघाडीसंदर्भात अद्याप नेत्यांकडून कोणताही संदेश आलेला नाही. त्यामुळे ही निवडणूक स्वबळावर लढविण्याची तयारी राष्ट्रवादीने केली आहे’, अशी माहिती राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, सांगली विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष कमलाकर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.  प्रा. पद्माकर जगदाळे, नगरसेवक विष्णू माने, युवक राष्ट्रवादीचे राहुल पवार, सचिन जगदाळे, महापालिकेतील विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते, दिग्विजय सूर्यवंशी, मैनुद्दीन बागवान मनोज भिसे, मुश्ताक रंगरेज उपस्थित होते. 

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा सत्कार विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याहस्ते  होणार आहे. राजकारणाबरोबरच सामाजिक, सहकार, शिक्षण, उद्योग, कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर तसेच व्यापारी, विविध संघटना, स्वयंसेवी संस्थांकडून जयंत पाटील यांचा सत्कार होणार आहे.  जयंत पाटील यांच्या आजपर्यंतच्या वाटचालीवर आधारित नऊ मिनिटांची ‘डॉक्युमेंटरी फिल्म’ यावेळी दाखविली जाणार आहे.  धनंजय मुंडे यांचे भाषण हे या कार्यक्रमाचे खास आकर्षण असल्याचे सांगण्यात आले. 

महापालिका निवडणुकीत काँग्रेसबरोबर आघाडी होणार अथवा नाही याबाबत वरिष्ठ नेत्यांनी कोणताही मेसेज दिलेला नाही. त्यामुळे महापालिका निवडणूक स्वबळावर लढविण्याची तयारी केली आहे. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस निश्‍चितच महापालिकेची सत्ता खेचून आणेल, असा विश्‍वास असे बजाज व पाटील यांनी व्यक्त केला.