Sun, May 26, 2019 10:37होमपेज › Sangli › राष्ट्रीय आर्थिक दुर्बल शिष्यवृत्ती झाली दुप्पट

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल शिष्यवृत्ती झाली दुप्पट

Published On: May 19 2018 1:35AM | Last Updated: May 18 2018 8:01PMसांगली : प्रतिनिधी

केंद्र शासनाने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी (एनएमएमएस)शिष्यवृत्ती रकमेत दुप्पट वाढ केली आहे. दरमहा 500 रुपयावरून दरमहा 1 हजार रुपये शिष्यवृत्ती  झाली आहे. सन 2013 ते 2016 मधील 2001 लाभार्थी विद्यार्थीही या वाढीव शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत, अशी माहिती शिक्षणाधिकारी (माध्यमिक) महेश चोथे यांनी दिली. 

केंद्र शासनाने बाराव्या नियोजन आयोगानुसार राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेसंदर्भात सन 2017-18 या वर्षापासून शिष्यवृत्ती रक्कम दरमहा 500 रुपयांवरून 1 हजार रुपये (तिमाहीसाठी 1500 रुपयांवरून 3 हजार रुपये व वार्षिक 6 हजार रुपयांवरून 12 हजार रुपये) केली आहे. शिष्यवृत्ती रकमेतील ही वाढ सन 2017-18 मध्ये शिष्यवृत्तीस पात्र असलेल्या 1) परीक्षा दि. 20 नोव्हेंबर 2016 (सन 2017-18 मध्ये इयत्ता नववी), 2) परीक्षा दि. 7 जानेवारी 2016 (सन 2017-18 इयत्ता 10 वी नुतनीकरण), 3) परीक्षा दि. 10 जानेवारी 2015 (सन 2017-18 इयत्ता 11 वी नुतनीकरण), 4) परीक्षा दि. 17 नोव्हेंबर 2013 (सन 2017-18 12 वी नुतनीकरण) या परीक्षेच्या विद्यार्थ्यांपासून पुढील होणार्‍या परीक्षांसाठी लागू होणार आहे. सन 2013 मधील 468, सन 2015 मधील 386, सन 2016 मधील 508 व सन 2016 मधील 639 लाभार्थी विद्यार्थी व यापुढील परीक्षांमधील पात्र लाभार्थी विद्यार्थी वाढीव शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत.