Wed, Sep 26, 2018 10:46



होमपेज › Sangli › अश्‍विनी बिंद्रे प्रकरणः नार्को टेस्टला कुरूंदकरचा नकार

अश्‍विनी बिंद्रे प्रकरणः नार्को टेस्टला कुरूंदकरचा नकार

Published On: Dec 28 2017 1:27AM | Last Updated: Dec 28 2017 2:08AM

बुकमार्क करा




पनवेल : प्रतिनिधी

सहायक पोलिस निरीक्षक अश्‍विनी बिंद्रे-गोरे बेपत्ता प्रकरणात अटकेत असलेला वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरूंदकर आणि राज्याचे माजी महसूलमंत्री भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा भाचा राजेश पाटील या दोघांनी नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंग करण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे.

गुरुवारी या दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात येणार होते. मात्र, तत्पूर्वीच न्यायालयाकडे आम्हाला ही टेस्ट मान्य नसल्याचा अर्ज वकिलामार्फत या दोघांनीही दिला आहे. आता नार्को टेस्ट करायची की नाही, यावर न्यायालयात सुनावणीनंतर निर्णय होईल. दरम्यान, अश्‍विनी गोरे बेपत्ता प्रकरणाच्या चौकशीदम्यान, अभय कुरूंदकर आणि राजेश पाटील उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने पोलिसांसमोर तपासाचे नवे आव्हान उभे राहिल्याने पोलिसांनी न्यायालयाकडे नार्कोेटेस्टसाठी परवानगी मागितली आहे. मात्र, दोन्ही संशयित आरोपींनी या टेस्टला नकार दिल्याने ही टेस्ट होणार की नाही, हे न्यायालयाच्या परवानगीनंतर ठरेल. तपासादरम्यान दोघेही माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत. पोलिसांच्या प्रश्‍नांना दोघेही सराईतपणे बगल देत असल्याने त्यांना बोलते करण्यासाठी पोलिसांचा कस लागत आहे.