Wed, Mar 27, 2019 05:59होमपेज › Sangli › गुजरात निवडणुकीनंतर मी मंत्री असणारच : नारायण राणे

गुजरात निवडणुकीनंतर मी मंत्री असणारच : नारायण राणे

Published On: Dec 10 2017 1:21AM | Last Updated: Dec 10 2017 9:13AM

बुकमार्क करा

इस्लामपूर : वार्ताहर

शिवसेनेचा विरोध असला तरीही गुजरात निवडणुकीनंतर राज्य मंत्रिमंडळात मी मंत्री असणारच, असा दावा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी पेठनाका येथे झालेल्या पत्रकार बैठकीत  केला. जिल्ह्यातील स्वाभिमान पक्षाचे उमेदवार नानासाहेब महाडिकच ठरवतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.  

सांगली जिल्ह्याच्या दौर्‍यावर आल्यानंतर राणे पेठनाका येथे नानासाहेब महाडिक यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते.  माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, नानासाहेब महाडिक, पंचायत समितीचे गटनेते राहुल महाडिक, माजी जिल्हापरिषद सदस्य सम्राट महाडिक उपस्थित होते.  

राणे म्हणाले, माझ्या मंत्रीपदाला शिवसेनेच्या असणार्‍या विरोधाला न जुमानता मुख्यमंत्री फडणवीस यांनी मला मंत्रीपदाचे आश्‍वासन दिले आहे. गुजरात निवडणुकीचा निकाल काहीही लागला तरी माझ्या मंत्रिमंडळातील समावेशावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. अर्थात त्या निवडणुकीत भाजपच विजयी होईल. निवडणुकीनंतर मी मंत्री असणारच. मी शिवसेनेची दखल घेत नाही. त्यांची दखल घ्यायला आता या पक्षाचे काय अस्तित्व राहिले आहे? 

शिवसेनेचे मंत्री निष्क्रीय...

मुख्यमंत्री फ डणवीस, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या नुकत्याच झालेल्या पश्‍चिम महाराष्ट्राच्या दौर्‍याविषयी बोलताना ते म्हणाले, ठाकरे या दौर्‍यात भाजप व मुख्यमंत्र्यावर टीका करून गेले.मात्र कर्जमाफी, शेतकर्‍यांचे प्रश्‍न, महागाई यावर ते काहीच बोलले नाहीत.   दिवाकर रावते, रामदास कदम, सुभाष देसाई हे शिवसेनेचे मंत्री निष्क्रीय आहेत. त्यांनी मंत्रीपदाचा काहीही प्रभाव पाडलेला नाही. त्याऐवजी जनतेतून निवडून आलेल्यांना शिवसेनेने मंत्रीपद द्यायला हवे होते, असेही राणे म्हणाले. 

जिल्ह्याची जबाबदारी महाडिकांकडे...

आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची  चाचपणी व पक्ष बांधणीसाठी हा दौरा असल्याचे स्पष्ट करून राणे म्हणाले, पुढील दौरा हा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर असेल. आपला पक्ष भाजपबरोबर युती करणार, की स्वतंत्र निवडणूक लढविणार, हे निवडणुकीच्याआधी त्यावेळची परिस्थिती पाहून जाहीर करू. जिल्ह्यातील स्वाभिमान पक्षाचे उमेदवार नानासाहेब महाडिक ठरवतील तेच असतील. ऐनवेळी पक्षात येणार्‍यांना उमेदवारी दिली जाणार नाही. 

संबंधित बातम्या :

राणेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज : आ. क्षीरसागर

राष्ट्रवादी काँग्रेसची ऑफर नाकारलीः राणे (व्हिडिओ)  

पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री पदासाठी लायक नव्हते : राणे (व्हिडिओ)

उद्धवला राजकारणाचा गंध नाही : नारायण राणे

शिवसेना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी : नारायण राणे