Thu, Mar 21, 2019 11:08होमपेज › Sangli › आरेवाडी बिरोबा मंदिरासाठी साडेचार कोटी रुपये देणार 

आरेवाडी बिरोबा मंदिरासाठी साडेचार कोटी रुपये देणार 

Published On: Dec 23 2017 2:11AM | Last Updated: Dec 23 2017 12:25AM

बुकमार्क करा

नागज : वार्ताहर

आरेवाडी (ता.कवठेमहांकाळ) येथील श्री बिरोबा मंदिराच्या विकासासाठी साडेचार कोटी रूपये तात्काळ देण्याचे आश्‍वासन पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी दिले. महाराष्ट्र,कर्नाटक व आंध्रप्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या आरेवाडीच्या बिरोबा मंदिर परिसरात पर्यटनस्थळ विकासाच्या दृष्टीने विविध विकासकामे प्रगतीपथावर आहेत.दरम्यान मंदिराच्या विकासासाठी शासनाकडून निधीची आवश्यकता असल्याने बिरोबा देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकार्‍यांनी आरेवाडी येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस,जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे साडेबारा कोटी रूपयांच्या निधीची मागणी केली होती.भाजपचे गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून हा निधी मिळवण्यासाठी  देवस्थानच्या पदाधिकार्‍यांचा  प्रयत्न  सुरू होता.

ना.रावल यांच्या आश्‍वासनामुळे गोपीचंद   पडळकर यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.मंदिरासाठी उर्वरित निधीही देण्याची ग्वाही ना.रावल यांनी  दिली. गुरूवारी नागपूर येथे झालेल्या बैठकीत साडेचार कोटी रूपयांचा निधी तात्काळ देण्याचे आश्‍वासन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकार्‍यांना दिले.जलसंधारण मंत्री राम शिंदे, भाजपाचे गोपीचंद पडळकर, वठेमहांकाळचे माजी उपसभापती जगन्नाथ कोळेकर, बिरोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष पै.रावसाहेब कोळेकर, एन.टी.कोळेकर, पोलिस पाटील रामचंद्र पाटील, जयवंतराव सरगर, विनायकराव मासाळ, अण्णा कोळेकर यांच्यासह देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.