होमपेज › Sangli › विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांनी यपावाडी केली स्वच्छ (video)

विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांनी यपावाडी केली स्वच्छ (video)

Published On: Dec 24 2017 2:40PM | Last Updated: Dec 24 2017 2:40PM

बुकमार्क करा

सांगली : वार्ताहर 

गावांचे सौंदर्य अबाधित राखणे, गाव स्वच्छ व सुंदर ठेवणे, ही जबाबदारी गावातील प्रत्येकाची  असते. शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी व गावांतील युवकांनी श्रमसंस्कार शिबीर राबवत यमाजी पाटलाची वाडी स्वच्छ केली.

येथील  प्रा. सदाशिव मोरे यांच्या मार्गदर्शनाद्वारे  युवक व ग्रामस्थांनी पुढाकार घेत गावात स्वच्छता अभियान राबविले. यामुळे संपूर्ण गाव स्वच्छ झाले. गावातील मुख्य रस्त्यासह संपूर्ण परिसराची सफाई करण्यात आली. या अभियानांतर्गत यपावाडी गावांतील  चौकाचौकाचा परिसर साफ करण्यात आला. 

श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयाच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या आयोजनातून गावात विविध उपक्रम राबवून  गाव सुंदर करण्याचा प्रयत्न ग्रामस्थांनी राबविला आहे.  विद्यार्थ्यांच्या व गावातील युवकांच्या या अभिनव उपक्रमाचे ग्रामस्थाकडून कौतुक होत आहे.