Wed, Apr 24, 2019 20:17होमपेज › Sangli › कवठेमहांकाळ तालुक्यात 6 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची सत्ता

कवठेमहांकाळ तालुक्यात 6 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची सत्ता

Published On: May 29 2018 1:32AM | Last Updated: May 28 2018 8:05PMकवठेमहांकाळ : प्रतिनिधी

तालुक्यातील 16 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत 6 गावच्या सरपंचपदावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी झेंडा फडकवला. खासदार संजय पाटील यांच्या भाजपने आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येकी 4 सरपंचपदावर कब्जा मिळविला. एका गावात काँग्रेसचे तर एका गावात संमिश्र पॅनल विजयी झाले.

तालुक्यातील 16 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत आमदार सुमनताई पाटील, महांकाली कारखान्याच्या अध्यक्षा अनिता सगरे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने माजी मंत्री घोरपडे यांच्या गटाबरोबर आघाडी केली होती. कोकळेमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आघाडी केली. काही गावात घोरपडे गट विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत झाली. खासदार संजयकाका पाटील गट बर्‍याच गावात एकला चलो रे अशी भूमिका घेऊन आघाडी विरुद्ध लढला. एका गावात घोरपडे आणि खा. पाटील यांची आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर लढली.

जाधववाडीत राष्ट्रवादी, घोरपडे गट

जाधववाडी ग्रामपंचायतीत घोरपडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीला घवघवीत यश मिळाले. सरपंच आणि 7 जागा या आघाडीला मिळाल्या. खा. पाटील गटाला भोपळा फोडता आला नाही. सरपंच यशवंत आप्पा बोदगिरे,  सदस्य  : विनोद भगवान सुर्यवंशी, वंदना बनाजी सुर्यवंशी, संध्या जनार्दन चव्हाण, महेशकुमार रावसाहेब साबळे, शांताबाई अशोक जाधव, आनंदा रामू चव्हाण, वैशाली संजय झुरे.

कुंडलापूरात भाजपची बाजी

कुंडलापुरात भाजपने बाजी मारली. सरपंच पदाच्या प्रतिष्ठेच्या लढतीत अनिल पाटील यांना धूळ चारत पोपटराव गिड्डे यांनी बाजी मारली. सरपंच पदासह 6 जागा मिळवताना घोरपडे, राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ दोन जागा मिळाल्या. सरपंच पोपट परशराम गिड्डे,सदस्य  : सुनिता संभाजी सोरटे,शितल सतिश पाटील,श्रीकांत यल्लाप्पा सोरटे, बाबासो तुकाराम मोहिते, अमृता विलास मोहिते, शोभा प्रमोद लिगाडे, दिपक अच्युतराव चव्हाण.

करोलीत काँग्रेस

करोली टी मध्ये बाजार समितीचे माजी सभापती प्रशांत शेजाळ यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलला सरपंच पद आणि 7 जागा मिळाल्या. घोरपडे गटाला 4 जागा मिळाल्या. सरपंच आशिका समाधान पवार, सदस्य  : बबन भाऊसो पाटोळे, नंदकुमार नामदेव करपे, वैशाली युवराज चव्हाण, शोभाताई शरद गिड्डे, सचिन दशरथ वायदंडे, मगंल धोडिंराम पाटोळे, सत्यश्री शंतनू पाटील, सुभाष जयवंत गिड्डे, वैशाली सुभाष सुर्यवंशी, सनी गोरख पडळकर, अमिता गोरख पडळकर.

ढालगाव, धुळगाव, कदमवाडी घोरपडे गटाकडे

ढालगावात राष्ट्रवादी आणि घोरपडे गटाने एकत्रित येत सरपंचपदावर बाजी मारली आणि 8 जागा मिळविल्या. भाजपला पाच जागांवर समाधान मानावे लागले. सरपंच मनिषा जनार्दन देसाई, सदस्य  : कविता संजय घागरे, प्रदीप शिवाजी वाघमारे, मगंल दगडू चव्हाण, विजय वसंत घागरे, सुमन संजय पाटील, दिलीप आप्पा झुरे, विशाल बाबासो खोलपे, कल्पना रमेश मायणे, भिमराव सखाराम घागरे, द्रौपदी मधुकर घागरे, जयश्री महेंद्र मणेर. माधवराव जालिंदर देसाई, सविता हरिबा भोदे.

कदमवाडीत घोरपडे गटाला 6 जागा आणि सरपंच पद मिळाले. अपक्षला एका जागेवर समाधान मानावे लागले. सरपंच मिनाक्षी दिलीप खांडेकर, सदस्य  : पूजा रविंद्र कदम, सतिश परशराम कदम, चंद्रकांत आप्पासो कदम, सतिश सदाशिव  खांडेकर, मिनाक्षी दिलीप खांडेकर,  अर्चना दिगंबर यादव, रुपाली अमितकुमार कदम. 

धुळगावमध्ये राष्ट्रवादीची सत्ता उलथून लावण्यात घोरपडे गटाला यश मिळाले.  घोरपडे गटाने खासदार पाटील गटाशी हातमिळवणी केली होती. या आघाडीला सरपंच आणि 8 जागा, राष्ट्रवादीला 3 जागा मिळाल्या. सरपंच शारदा अर्जुन भोसले, सदस्य  : रेखा अरविंद भोसले, बाबासाहेब सदाशिव कुंभार, राजू निवृत्ती हजारे, पद्मिनी जगन्नाथ कनप, छबुताई ज्ञानेश्वर भोसले, ललिता तुकाराम भोसले, वर्षा कृष्णदेव चौगुले, शिवाजी सिदोबा ढोले, केशव जालिंदर भोसले, सुवर्णा मारूती गुरव, गौतम शामराव शेश्वरे.

मोरगाव, गर्जेवाडी, देशिंग,  रामपूरवाडी राष्ट्रवादी कडे

मोरगाव मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली. सरपंचपद राष्ट्रवादीने मिळविले, तर घोरपडे गटाला 3, राष्ट्रवादीला 2 आणि अपक्षला दोन जागा मिळाल्या. सरपंच रमेश तुकाराम काशिद,सदस्य  : राजश्री शरद पवार, अजितराव जगन्नाथ पवार, सुजाता नामदेव घोरपडे, जनाबाई आनंदा माळी, रामचंद्र धोनी वावरे, रत्नाबाई पांडुरंग लवटे, संदीप किसन हारगे

देशिंगमध्ये राष्ट्रवादी काँगेसने सरपंचपदावर बाजी मारली. सदस्य पदासाठीच्या निवडणुकीत मतदारांनी राष्ट्रवादीला आणि घोरपडे गटाला समान संधी मिळाली. प्रत्येकी 6 जागा मिळाल्या. एक सदस्य बिनविरोध निवडून आला आहे. सत्तेची मदार बिनविरोध सदस्यांवर राहणार आहे. सरपंच अलका आप्पासो कोळेकर, सदस्य  : मगंल हणमंत जगताप, अमुकसिध्द म्हाकू वावरे, प्रेमला नितिन कलढोणे, जगन्नाथ आण्णाप्पा पाटील, मेघा मुकुंद जोशी, रामचंद्र अधिकराव डुबुले, सुरेश बाळगोंडा पाटील, आक्काताई राजाराम तोडकर,राही रावसाहेब सदामते, प्रतापकुमार रामचंद्र माने, अंजली प्रविण पवार, वैशाली माय्याप्पा वावरे, सुनिल गोपाळ माने. 

रामपूरवाडीत घोरपडे गटाची सत्ता राष्ट्रवादी, काँग्रेस आणि खासदार संजय पाटील गटाने एकत्रित येऊन उलथवून टाकली. सरपंचपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेले. आघाडीला सर्व जागा मिळाल्या. सरपंच नितीन दादासाहेब गडदे, सदस्य  : कल्पना संभाजी इमडे, किरण तुकाराम इमडे, महादेव चंद्रकांत खोत, सोनाली अनिल गडदे, शांताबाई धोडिंराम गडदे, निता बाबासो गायकवाड, विजय विलास माने.

गर्जेवडीत राष्ट्रवादीने भाजपच्या गटाला धूळ चारली. राष्ट्रवादीला सरपंच आणि 5 जागा मिळाल्या, 2 जागा भाजपला मिळाल्या. सरपंच मालन विठ्ठल हाक्के, सदस्य  : प्रल्हाद रामभाऊ हाक्के, शंकर श्रीपती शिंगाडे, वंदना मोहन सुतार, सावंत ईश्वरा हाक्के, संगिता कुंडलिक सरवदे, पुष्पाताई जयसिंग हाक्के, गोकुळाबाई निवृत्ती सरवदे

कोकळेमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी

कोकळेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्या आघाडीला सरपंच पद आणि आठ जागा मिळाल्या. विरोधी घोरपडे गटाला केवळ 3 जागांवर समाधान मानावे लागले. विजयी उमेदवार असे : सरपंच सुवर्णा धनाजी भोसले, सदस्य : विजयकुमार विलास तोडकर, रमेश बाबूराव महाजन,द्राक्षायणी दत्ताजी भडके,मेघा विदयाधर पोतदार, रामचंद्र तातोबा शिंदे, उदय गणपती शिंदे, मालन पंडीत पवार, लक्ष्मी भाऊसो नागणे, विनायक बळवंत कांबळे, कमल सर्जेराव चव्हाण,सुलभा रमेश कांबळे.

दुधेभावी, घोरपडी, ढोलेवाडीवर चंद्रकांत हाके गटाचा कब्जा

ढोलेवाडी ग्रामपंचायतीत चंद्रकांत हाके यांच्या नेतृत्वाखालील भाजपने बाजी मारली. सर्व 7 जागा आणि सरपंचपद भाजपने जिंकल्या. घोरपडे, राष्ट्रवादीला भोपळा ही फोडता आला नाही. सरपंच वंदना राजाराम खरात, सदस्य  : राजेंद्र तानाजी चोरमुले, द्रौपदी शिवाजी घुटुगडे,जनाबाई शिवाजी दुधाळ, संतोष सोपान रूपनर, लता नारायण मेनकुदळे, रूपाली राजाराम दुधाळ, सुखदेव नामदेव हाक्के.

दुधेभावीत चंद्रकांत हाके गटाने बाजी मारली. भाजपला सरपंचपद आणि 8 जागा मिळविल्या. घोरपडे आणि राष्ट्रवादीला केवळ एक जागा मिळाली.  सरपंच संगिता राजाराम काटे,सदस्य  : शांताबाई विठोबा नरळे, वजाबाई दरीबा दुधाळ, कासिम बाबालाल खाटीक, प्रियांका आकाराम हेगडे, शारदा जगन्नाथ फोंडे, ताराबाई गोविंद दुधाळ, भाऊसाहेब शंकर फोंडे, बाबालाल खाटीक इसाक, प्रकाश चंद्रकांत हाक्के.

घोरपडीतही भाजपने सत्ता मिळविली. भाजपला सरपंच आज पाच जागा तर घोरपडे गटाला 4 जागा मिळाल्या.  सरपंच वनिता दिलीप सरगर, सदस्य  : तुकाराम धोडिंबा टेंगळे, चंद्रकांत बाबू जाधव, शिवाजी गोपीनाथ  सरगर,  विदया शिवाजी जाधव, निलम बिरूदेव ठोंबरे, आक्काताई पांडुरंग ऐवळे, भगवान पांडुरंग टोणे, राणी अशोक पुजारी, शालन शंभू धायगुडे.

गटनिहाय सरपंच असे

राष्ट्रवादी काँग्रेस : मोरगाव, गर्जेवाडी, देशिंग, जाधववाडी, रामपूरवाडी, कोकळे.

भाजप : कुंडलापूर, दुधेभावी, ढोलेवाडी, घोरपडी.

अजितराव घोरपडे गट : ढालगाव, शिंदेवाडी, धुळगाव, कदमवाडी.

काँग्रेस : करोली टी

स्थानिक आघाडी : बसप्पावाडी.