Wed, Jan 23, 2019 07:11होमपेज › Sangli › राष्ट्रवादीच्या ‘हल्लाबोल’ यात्रेत आष्टेकरांचा सहभाग

राष्ट्रवादीच्या ‘हल्लाबोल’ यात्रेत आष्टेकरांचा सहभाग

Published On: Dec 21 2017 1:51AM | Last Updated: Dec 20 2017 10:35PM

बुकमार्क करा

आष्टा : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने काढण्यात आलेल्या यवतमाळ ते नागपूर ‘हल्लाबोल’ पदयात्रेत  येथील अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. राज्यात सर्वाधिक शेतकर्‍यांच्या आत्महत्या झालेल्या यवतमाळ जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पदयात्रा काढून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या पदयात्रेत आमदार जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे या नेत्यांसह राज्यातून कार्यकर्ते सहभागी झाले होते.

येथील राजारामबापू पाटील कारखान्याचे संचालक विराज शिंदे, दादासाहेब शेळके, सुनील जाधव, शकील मुजावर, उदय कुशिरे, सुनील माने आदी सहभागी झाले होते.