Thu, Aug 22, 2019 12:29होमपेज › Sangli › बरं झालं १६ व्या शतकात संघ नव्‍हता नाहीतर... : मुंडे

अच्‍छे दिन हा आता चेष्‍टेचा विषय : धनंजय मुंडे

Published On: Apr 05 2018 1:19PM | Last Updated: Apr 05 2018 1:16PMतासगाव(सांगली) : पुढारी ऑनलाईन

भाजप सरकारने दाखविलेले 'अच्‍छे दिन'चे स्‍वप्‍न आता घराघरात चेष्‍टेचा विषय झाला आहे. हल्‍लाबोल आंदोलनाचा चौथा टप्‍पा सुरू असून आंदोलन पाचव्या टप्प्यात जाईल, तेव्‍हा भाजप सरकार संपलेले असेल, असे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्‍हणाले. राष्‍ट्रवादी काँग्रेसच्या हल्‍लाबोल आंदोलनाचा चौथा टप्‍पा सुरू असून आज तासगाव (सांगली) येथे आंदोलन झाले. यावेळी सभेत बोलताना मुंडे यांनी भाजप सरकारला धारेवर धरले. 

यावेळी मुंडे यांनी राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघावरही निशाणा साधला. "बरं झालं की १६ व्या शतकात 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ' अस्तित्वात नव्हता, नाहीतर हे संघवाले म्हणाले असते की छञपती शिवाजी महाराज सुद्धा संघाचे होते," अशी बोचरी टीका राजगुरु प्रकरणावरून मुंडे यांनी संघावर केली. 

सत्ता आल्यावर हिशोब चुकता करणार : जयंत पाटील

माजी मंत्री जयंत पाटील यांनीही भाजप सरकारवर हल्‍लाबोल केला. राज्यातील सरकारचा कारभार बघितल्यास पुन्‍हा भाजपची सत्ता येणार नाही, याची खात्री देतो. तसेच राष्‍ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर केलेल्या अन्यायाचा हिशोब आमचे सरकार आल्यावर करू, असे पाटील म्‍हणाले.

दरम्यान, राष्‍ट्रवादी काँग्रेसने राज्यभर हल्‍लाबोल आंदोलन सुरू केले आहे. त्याचा चौथा व शेवटचा टप्‍पा पश्चिम महाराष्‍ट्रात सुरू आहे. कोल्‍हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकातून या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. 

Tags : NCP, dhananjay munde, BJP, jayant patil, hallabol