Sun, Apr 21, 2019 06:36होमपेज › Sangli › प्रत्येक गावात राष्ट्रवादीच्या बुथ समित्या करा : नाईक 

प्रत्येक गावात राष्ट्रवादीच्या बुथ समित्या करा : नाईक 

Published On: May 31 2018 1:46AM | Last Updated: May 30 2018 7:18PMनेर्ले : वार्ताहर

पक्षाचे विचार, ध्येय-धोरणे, केलेली विकासकामे तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक गावात बुथनिहाय समित्या अत्यंत गरजेच्या आहेत. त्यांची त्वरित स्थापना करा, असे आवाहन माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.पेठ ( ता. वाळवा) येथे  राष्ट्रवादी काँग्रेसच्य  बैठकीत ते बोलत होते. वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विजय पाटील  उपस्थित होते. तालुकाध्यक्ष पाटील म्हणाले, सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रथम क्रमांकावर न्यायचा आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी बुथ कमिटीच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे. महिला राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष छाया पाटील, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संग्रामसिंह पाटील, महिला राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्ष सुश्मिता जाधव, राजारामबापू कारखान्याचे संचालक आनंदराव पाटील, राजारामबापू बँकेचे संचालक संजय पाटील उपस्थित  होते. डॉ. सुभाष भांबुरे यांनी आभार मानले.