Wed, Feb 20, 2019 05:25होमपेज › Sangli › इस्लामपूरमध्ये 26 मे रोजी संगीत रजनी

इस्लामपूरमध्ये 26 मे रोजी संगीत रजनी

Published On: May 23 2018 1:07AM | Last Updated: May 22 2018 9:03PMइस्लामपूर : प्रतिनिधी

दै. पुढारी कस्तुरी क्‍लब व इस्लामपूर येथील सरगम ग्रुप हमारा यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 26 मे रोजी सायंकाळी 6 वाजता हिंदी व मराठी गाण्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राजारामबापू नाट्यगृहात हा कार्यक्रम होणार आहे. कस्तुरी सभासद महिला व त्यांच्या कुटुंबियांसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. इस्लामपूर शहरातील संगीतकार, डॉक्टर, इंजिनिअर्स, अ‍ॅडव्होकेट, प्रोफेसर, उद्योजक, व्यापारी, कमर्शिअल आर्टिस्ट या हौसी कलाकारांनी एकत्र येऊन सरगम ग्रुप हमारा हा व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप तयार केला आहे. या ग्रुपने आजपर्यंत अनेक हिंदी, मराठी गाण्यांचे अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत. 

आजपर्यंत कस्तुरी क्‍लबने महिलांसाठी अनेक सांस्कृतिक, सामाजिक, आरोग्यविषयक, शैक्षणिक, विविध वर्कशॉप, मनोरंजन  आदी कार्यक्रम तसेच महिलांच्या सुप्‍तगुणांना वाव देणारे  सिने कलाकार, टी.व्ही. कलाकार यांच्यासमवेत कार्यक्रम आयोजित केले आहेत. या वाद्यवृंदामध्ये हेमंत पांडे, प्रा. महेज जोशी, डॉ. अतुल मोरे, डॉ. विनय राजमाने, डॉ. राहुल नाकील, डॉ. नितीन जाधव, डॉ. नीलम पाटील, डॉ. जिज्ञा शहा, वंदना कांबळे, ज्ञानेश्‍वरी पाटील, राजाभाऊ पाटील, सचिन टिकारे, धीरज राजमाने, संतोष हुक्कीरे, दीपक राजमाने, विजय नांगरे, अ‍ॅड. अभिजित परमणे, डॉ. सुजाता डबाणे, दीपक माने, संदीप पाटील, डॉ. राम कुलकर्णी, माधुरी कुलकर्णी व उदय राजमाने आदी सहभागी होणार आहेत.

संपर्क : संयोजिका मंगल देसावळे,

इस्लामपूर, ऑफिस : (02342) 222333, मोबा. 8830604322.