Tue, Apr 23, 2019 13:57होमपेज › Sangli › खुनीहल्ला : चौघेजण ताब्यात

खुनीहल्ला : चौघेजण ताब्यात

Published On: Jan 04 2018 1:03AM | Last Updated: Jan 03 2018 11:40PM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

शहरातील जलभवनच्या पिछाडीस असणार्‍या किसान चौकात आरडा-ओरडा करण्यास रोखल्याने घरात घुसून तलवारीने खुनीहल्ला चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. दि. 31 रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली होती. चौघांचीही बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.  

यामध्ये धनंजय काटे गंभीर जखमी झाला होता तर त्याचा चुलत भाऊ वैभव, चुलते विजय काटे किरकोळ जखमी झाले होते. याप्रकरणी प्रीती बापुसाहेब काटे यांनी फिर्याद दिली आहे. काटे कुटुंबिय विश्रामबागमधील जलभवनच्या पिछाडीस असलेल्या किसान चौक परिसरात राहतात. 

रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास तीन युवक मोपेडवरून त्यांच्या घराजवळ आले. तिघेही जोरात आरडा-ओरडा करीत होते. त्यावेळी धनंजयने त्यांना इथे दंगा करू नका पुढे जा असे सांगितले. त्याचा राग मनात धरून तिघेही त्यांच्या घरात घुसले. घरातील साहित्याची मोडतोड करून धनंजयवर तलवारीने हल्ला केला. याप्रकरणी चौघांनाही बुधवारी ताब्यात घेण्यात आले. ते धामणी, मिरज, सांगलीतील सावंत प्लॉट, वारणालीतील असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.