Fri, Apr 26, 2019 15:30होमपेज › Sangli › सांगली : डोक्यात रॉड घालून एकाचा खून; एकजण जखमी

सांगली : डोक्यात रॉड घालून एकाचा खून; एकजण जखमी

Published On: Apr 18 2018 12:14PM | Last Updated: Apr 18 2018 12:13PMसांगली : प्रतिनिधी

आपटा पोलीस चौकी समोरील अपार्टमेंटमध्ये एका युवकाचा खून करण्यात आला आहे. तर या घटनेत एक वृद्ध जखमी आहे. सदरची घटना उघडकीस आल्यानंतर विश्रामबाग पोलीसानी  घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आपटा चौकी समोरील श्री अपार्टमेंटमध्ये दुसऱ्या मजल्यावर पारेख कुटुंबीय राहते. या कुटुंबातील टिलूभाई पारेख आणि त्यांची आज्जी राहत होती. मध्यरात्रीच्या सुमारास पारेख यांच्या फ्लॅट मध्ये खुनाचा प्रकार घडला. यामध्ये टिलू पारेख यांच्या डोक्यात रॉड घालून खून करण्यात आला. त्याची आजी या घटनेत गंभीर जखमी झाली आहे.  सकाळी हा प्रकार उघडकीस आला. घटनेनंतर तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीला रुग्णालयात पाठवले. तर टिलू पारेखचा मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

या घटनेची माहिती मिळताच श्री अपार्टमेंटच्या आवारात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. या खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट असून याबाबत विश्रामबाग पोलीस अधिक तपास करीत आहेत