Wed, Apr 24, 2019 08:13होमपेज › Sangli › मनपा विरोधी पक्षनेतेपदी उत्तम साखळकर

मनपा विरोधी पक्षनेतेपदी उत्तम साखळकर

Published On: Aug 28 2018 1:44AM | Last Updated: Aug 27 2018 11:32PMसांगली : प्रतिनिधी

महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसचे उत्तम साखळकर यांची निवड झाली. शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी सोमवारी (दि. 27) मनपा नगरसचिव कल्लाप्पाण्णा हळींगळे यांना त्यासंदर्भात निवडीचे पत्र दिले. पृथ्वीराज पाटील यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. ते म्हणाले, साखळकर यांना ही सव्वा वषार्ंसाठी संधी आहे. पाच वर्षांत चारजणांना संधी देऊ. 

ते म्हणाले, महापालिका कारभाराचा अनुभव भाजपला नाही. त्यामुळे  नागरिकांच्या हिताविरोधी निर्णय घेतले गेल्यास साखळकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सक्षम विरोधक म्हणून त्यांना विरोध करेल.

भाजपच्या  महापौर, उपमहापौरांनी सोमवारी पदभार स्वीकारला. राष्ट्रवादीने गटनेतेपदी मैनुद्दीन बागवान यांना संधी दिली पण 20 सदस्य असलेल्या काँग्रेसचे विरोधी पक्षनेतेपदावर एकमत होत नव्हते. या पदासाठी उत्तम साखळकर, मंगेश चव्हाण, संजय मेंढे व वहिदा नायकवडी यांच्या नावाची चर्चा होती. मात्र आमदार विश्वजीत कदम, जयश्री पाटील, विशाल पाटील व पृथ्वीराज पाटील यांनी साखळकर यांची शिफारस केली होती.

सोमवारी अखेर सर्व नेत्यांनी उत्तम साखळकर यांच्या नावावर शिक्कामोतर्ब केले. पृथ्वीराज पाटील  म्हणाले, सर्व सदस्य व नेत्यांशी चर्चेने हा निर्णय घेतला आहे. साखळकर हे अनुभवी आहेत. सर्वांना विश्वासात घेऊन ते काम करतील व जनतेच्या हिताविरोधात सत्ताधारी भाजपने घेतलेले विषय काँग्रेसचे नगरसेवक हाणून पाडतील. 

निवडीनंतर त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी साखळकर म्हणाले, नेत्यांचा विश्‍वास सार्थ ठरवून काँग्रेस सक्षम विरोधक आहे हे कामातून दाखवू. यावेळी प्रवक्ते करीम मेस्त्री, नगरसेवक संतोष पाटील, नगरसेवक प्रकाश मुळके, फिरोज पठाण, मनोज सरगर, माजी उपमहापौर प्रशांत पाटील, युवा नेते अमर निंबाळकर, रविंद्र वळवडे, बिपीन कदम, रवी खराडे आदी उपस्थित होते.