Fri, Apr 26, 2019 17:28होमपेज › Sangli › आटपाडी ग्रामपंचायतीची नगरपरिषद करा

आटपाडी ग्रामपंचायतीची नगरपरिषद करा

Published On: Jan 08 2018 1:15AM | Last Updated: Jan 07 2018 10:45PM

बुकमार्क करा
आटपाडी :  प्रतिनिधी 

आटपाडी ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपरिषदेत करावे, अशी मागणी स्वाभिमानी आघाडीचे नेते भारत पाटील व शिष्टमंडळाने खासदार संजय पाटील यांच्याकडे केली. खा. पाटील यांनी नगरविकास खात्याकडे याबाबत पाठपुरावा करुन हा प्रश्‍न मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिले.

आटपाडी ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रुपांतर करावे, अशी मागणी होत आहे. शासनस्तरावर तालुक्याचे ठिकाण असलेल्या ग्रामपंचायतीचे  नगरपरिषद किंवा नगरपंचायतीत रुपांतर करावे, असा निर्णय झाला आहे. मात्र आटपाडीच्या बाबतीत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही.

ग्रामपंचायतीऐवजी नगरपरिषद झाल्यास आटपाडीच्या विकासाला चालना मिळेल, अशी भूमिका मांडत भारत पाटील यांनी  खा. पाटील यांना शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन दिले. यावर त्यांनी याबाबत पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन दिले. ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत दौंडे, विनायक पाटील, दादासाहेब पाटील, अभिमन्यू विभुते, जिल्हा परिषद सदस्य शेंडगे व कार्यकर्ते उपस्थित होते.