Sat, Nov 17, 2018 06:38होमपेज › Sangli › मनपा उपायुक्त सुनील पवार यांची बदली

मनपा उपायुक्त सुनील पवार यांची बदली

Published On: Jun 13 2018 1:35AM | Last Updated: Jun 13 2018 12:13AMसांगली : प्रतिनिधी

महापालिकेचे उपायुक्त सुनील पवार यांची मंगळवारी बदली करण्यात आली. नगरविकास विभागाने सायंकाळी त्यांच्या बदलीचे आदेश दिले. अहमदनगरच्या जिल्हा प्रशासन अधिकारी (नगरपालिका) या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पवार यांच्या बदलीमुळे महापालिकेत खळबळ उडाली आहे.पवार यांची महापालिकेच्या उपायुक्तपदी 31 ऑगस्ट 2015 रोजी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांचा तीन वर्षाचा कार्यकाल पूर्ण होत आला आहे. त्यांच्या बदलीची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. पण महापालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असल्याने त्यांची बदली लांबण्याची शक्यता होती. पण मंगळवारी सायंकाळी त्यांच्या बदलीचे आदेश महापालिकेला प्राप्त झाले.  त्यांना मंगळवारीच कार्यमुक्त करण्यात आले. 

महापालिकेत  पवार यांच्यासोबत नगरसेवक व अधिकार्‍यांचे नेहमीच सलोख्याचे संबंध राहिले. गेल्या सहा ते सात महिन्यापासून तर  उपायुक्त पवार यांनी महासभेला हजेरी लावत प्रशासनावरील अनेक आरोप, टीकांना प्रत्युत्तर दिले होते. त्यांच्याबद्दल कधीच महापालिकेत संघर्षाचा प्रश्न निर्माण झाला नाही.   प्रभाग रचना, आरक्षण सोडती, प्रारुप मतदार याद्या तयार करण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजाविली होती. त्यांच्या बदलीने अधिकारी, पदाधिकारी, नगरसेवकांनाही धक्का बसला.