Wed, Apr 24, 2019 11:31होमपेज › Sangli › सांगली, मिरजेत पोलिसांचे संचलन

सांगली, मिरजेत पोलिसांचे संचलन

Published On: Jan 08 2018 1:15AM | Last Updated: Jan 07 2018 11:11PM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

राज्यासह जिल्ह्यातील तणावग्रस्त परिस्थितीच्या तसेच सोमवारी सांगलीत होणार्‍या मोर्चाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी रविवारी सायंकाळी सांगली व मिरजेतील प्रमुख मार्गांवर संचलन केले. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा आणि अतिरिक्‍त अधीक्षक शशिकांत बोराटे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी सुसज्ज यंत्रणांसह संचलनात सहभागी झाले होते. 

वढू, भीमा-कोरेगाव येथील घटनांचे पडसाद सांगली जिल्ह्यातही उमटले. यावेळी जिल्ह्यात अनेक ठिकाणी तोडफोड, जाळपोळ करण्यात आली होता. पोलिसांनी प्रसंगावधान राखल्याने सांगलीत दोन गट समोरा-समोर येऊनही अनुचित प्रकार टळला होता. या पडसादामुळे जिल्ह्यात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. सध्या जिल्ह्यातील वातावरण पूर्वपदावर असून सोमवारी सांगलीत सद्भावना रॅली काढण्यात येणार आहे. 

त्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी शक्‍तिप्रदर्शन करीत शहरात संचलन केले. आंबेडकरनगर येथून याला प्रारंभ करण्यात आला. झुलेलाल चौक, बसस्थानक, मारुती रस्ता, हरभट रस्ता, टिळक चौकमार्गे गणपती मंदिर, गणपती पेठमार्गे पटेल चौकापर्यंत संचलन करण्यात आले. 

जिल्हा पोलिस अधीक्षक शर्मा, अतिरिक्‍त अधीक्षक बोराटे यांनी याचे नेतृत्व केले. यावेळी उपअधीक्षक धीरज पाटील, नागनाथ वाकुडे, किशोर काळे, अमरसिंह निंबाळकर, निरीक्षक रविंद्र डोंगरे, रविंद्र शेळके, प्रताप पोमण, रमेश भिंगारदेवे, श्रीकांत पिंगळे यांच्यासह अधिकारी, शेकडो कर्मचारी सहभागी झाले होते. यामध्ये राज्य राखीव दलाची एक तुकडी, बॉम्ब शोध पथक, दंगल नियंत्रण पथक, जलद कृती दल, होमगार्ड, अश्रूधूर पथकांचा सहभाग होता.