Thu, Apr 25, 2019 21:45होमपेज › Sangli › रमजान ईदच्या पार्श्‍वभूमीवर सांगलीत पोलिसांचे संचलन

रमजान ईदच्या पार्श्‍वभूमीवर सांगलीत पोलिसांचे संचलन

Published On: Jun 16 2018 1:31AM | Last Updated: Jun 16 2018 1:31AMसांगली : प्रतिनिधी

रमजान ईदच्या पार्श्‍वभूमीवर सांगली शहरात शुक्रवारी सायंकाळी पोलिसांनी संचलन केले. यामध्ये तीनशेहून अधिक अधिकारी, कर्मचार्‍यांचा फौजफाटा सहभागी झाला होता. ईदच्या पार्श्‍वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी सतर्कतेचे आदेश अधिकार्‍यांना दिले आहेत. शुक्रवारी सायंकाळी स्टेशन चौकातील पोलिस उपअधीक्षक कार्यालयापासून संचलनाला सुरूवात करण्यात आली. बदाम चौक, नळभाग, खणभाग, राम मंदीर, पंचमुखी मारूती रस्ता, रिसाला रस्ता, तरूण भारत स्टेडियम या मार्गावरून शहर पोलिस ठाण्याजवळ संचलनाची सांगता करण्यात आली.