Sun, Jul 21, 2019 13:05होमपेज › Sangli › मराठा आरक्षणासाठी शनिवारी इस्लामपूर येथे आंदोलन

मराठा आरक्षणासाठी शनिवारी इस्लामपूर येथे आंदोलन

Published On: Jul 24 2018 1:09AM | Last Updated: Jul 23 2018 10:27PMइस्लामपूर : वार्ताहर 

मराठा आरक्षणासाठी शनिवारी ( दि. 28) इस्लामपूर येथे धरणे आंदोलन तर रविवारी रास्तारोको आंदोलन करण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चा वाळवा तालुका समन्वयकांच्या बैठकीत घेण्यात आला. या आंदोलनात मराठा समाज बांधवांनी सामील होण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे. सोमवारी येथील शासकीय विश्रामगृहात मराठा क्रांती मोर्चा वाळवा तालुका समन्वयकांची बैठक झाली. या बैठकीमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर शासनाच्या निषेधार्थ दि. 28 रोजी छत्रपती  शिवरायांच्या अश्‍वारूढ पुतळ्याजवळ धरणे आंदोलन व दि. 29 रोजी  इस्लामपूर बसस्थानकाजवळ पेठ-सांगली रस्त्यावर रास्तारोको करण्याचा निर्णय झाला.

या दोन दिवशीय आंदोलनामध्ये तालुक्यातील प्रत्येक मराठा बांधवांनी सहभागी होऊन मराठ्यांची अस्मिता जपावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. आंदोलनाच्या तयारीसाठी बुधवारी ( दि. 25) शासकीय विश्रामगृहात तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांची बैठक सकाळी 11 वाजता  होणार आहे. यावेळी सागर जाधव, महेश भोसले, युवराज सूर्यवंशी, दिग्विजय पाटील, महेश हर्षे, अनिल शिंदे, उमेश कुरळपकर, विजय महाडिक, सचिन पवार, उदय चौधरी आदी उपस्थित होते.