Fri, Jul 19, 2019 16:16होमपेज › Sangli › कोर्ट फी वाढीच्या निषेधार्थ आंदोलन

कोर्ट फी वाढीच्या निषेधार्थ आंदोलन

Published On: Jan 28 2018 1:33AM | Last Updated: Jan 27 2018 11:41PMसांगली : वार्ताहर

राज्य शासनाने कोर्ट फीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ केल्याच्या निषेधार्थ वकील संघटनेने गुरुवारी कामकाजातही भाग घेतला नाही. जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन कोर्ट फी वाढ मागे घेण्याची मागणी केली.

शासनाने कोर्ट फी वाढीसंदर्भात नुकतेच परिपत्रक काढले आहे. त्यानुसार दावा कोर्ट फी, अर्जावरील तिकीट, कॅव्हेटचे तिकीट  व अन्य तिकिटांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ केली आहे. या वाढीमुळे सर्वसामान्य पक्षकारांना फटका बसणार आहे. शासन एकीकडे अल्पदरात न्याय देण्याची भाषा करीत असताना तिकीट व फीच्या माध्यमातून न्याय महाग होत असल्याने पक्षकार व वकिलांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

फी वाढीसंदर्भात वकील संघटनेने दि.24 जानेवारीरोजी बैठक बोलविली होती. या बैठकीतील ठरावानुसार आज  वकिलांनी न्यायालयीन कामकाजात भाग न घेतला नाही. संघटनेचे अध्यक्ष शैलेंद्र हिंगमिरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. सामान्य माणसांना न परवडणारी वाढीव फीवाढ मागे घेण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा, असे आवाहन निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.

यावेळी  वकील संघटनेचे उपाध्यक्ष प्रशांत जाधव, सचिव प्रदीप जाधव, सहसचिव दीपक हजारे, अ‍ॅड. संतोष मधाळे, अ‍ॅड. नितीन पाटील, अ‍ॅड. करणसिंह ठाकूर आदी वकिलांच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले.