Tue, Apr 23, 2019 23:53होमपेज › Sangli › सांगलीत पॅनकार्ड कंपनी विरोधात आंदोलन

सांगलीत पॅनकार्ड कंपनी विरोधात आंदोलन

Published On: Jan 30 2018 8:41PM | Last Updated: Jan 30 2018 8:41PMसांगलीः प्रतिनिधी

पॅनकार्ड या  कंपनीच्या गुंतवणूकदारांनी आज त्यांच्या विविध मागण्यासंदर्भात येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.  मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा राष्ट्रशक्ती इन्व्हेस्टर्स को-ऑर्डीनेशन या समितीच्या पदाधिकार्‍यांनी निवेदनाव्दारे प्रशासनास दिला आहे. 

पॅनकार्ड कंपनीवर सेबीच्या माध्यमातून सरकारने बंदी आणली आहे. त्यानंतर कंपनीच्या मिळकती विकून गुंतवणूकदारांचा परतावा द्या, असे आदेश  न्यायालयाने दिले आहेत.तरीसुद्धा सेबीकडून मिळकतीची विक्री करताना 50 ते 60 टक्क्यांनी कमी करून ती विकली जात आहे. ही प्रक्रिया संशयास्पद आहे. त्यामुळे सर्व गुंतवणूकदारांनी  संघटना तयार केली आहे. या संघटनेतर्फे राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातील अनेक लोकांनी या कंपनीत गुंतवणूक केली असून सुमारे चारशे कोटी रुपये अडकले आहेत.  सेबी व कंपनी मिळून मनमानी उद्योग करीत आहे.   सेबीने बदलेल्या कायद्यातील तरतुदीचा आधार घेत कंपनीवर बंदी घातलेली आहे. त्यातील गुंतवणूकदारांचा परतावा देण्याचे काम सुरू आहे. परंंतु कंपनीची मालमत्ता विक्री करताना  कमी दराने विक्री केली जात आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये असंतोष निर्माण होत आहे. 

यासंदर्भात खासदार व आमदारांना निवेदन देऊन गुंतवणूकदारांना न्याय द्यावा, अशी मागणी केलेली आहे. या मागणीची दखल घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष एन. एस. कचरे, सुभाष जाधव, आर. टी. सरगर, डी. पी. ढवळे  एम. बी. मोरे, एस. एल. साळवी  आदी सहभागी झाले होते.