होमपेज › Sangli › बोरगावातील अपघातात मोटारसायकलस्वार ठार

बोरगावातील अपघातात मोटारसायकलस्वार ठार

Published On: Jan 25 2018 1:01AM | Last Updated: Jan 24 2018 11:19PM
कवठेमहांकाळ : प्रतिनिधी

तालुक्यातील बोरगाव फाटा येथे मोटारसायकलला पिकअप गाडीने जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात आनंदराव एकनाथ पाटील (रा. बोरगाव) हे मोटारसायकलस्वार ठार झाले. हा अपघात बुधवारी दुपारी झाला. अपघाताची कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

बोरगाव येथील दिंडी माघीवारीसाठी बुधवारी पंढरपूरला रवाना झाली. त्या दिंडीला निरोप देण्यासाठी आनंदराव पाटील हे शिरढोणपर्यंत गेले होते. दिंडीला निरोप देऊन ते गावाकडे निघाले होते. गावाकडे वळण घेत असताना त्यांच्या मोटारसायकलला (एमएच 09 डीएल 268) सांगोल्याकडे निघालेल्या भरधाव बोलेरो पिकअप गाडीने (एमएच10 बीआर 4388) जोरदार धडक दिली. त्यामध्ये पाटील यांच्या डोक्याला जोरदार मार लागला. त्याचबरोबरच त्यांचा पायही मोडला. पाटील यांना मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना सायंकाळी त्यांच्या मेंदूमध्ये  रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांचे निधन झाले.

बोरगावचे माजी सरपंच नितीन पाटील यांच्यासह पाटीलवस्ती आणि गावातील लोकांनी अपघातस्थळी धाव घेतली. पाटील यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे.