Wed, May 22, 2019 10:13होमपेज › Sangli › सावकारीच्या वादातून कुंडलमध्ये हाणामारी

सावकारीच्या वादातून कुंडलमध्ये हाणामारी

Published On: Jan 29 2018 1:31AM | Last Updated: Jan 28 2018 11:41PMकुंडल : वार्ताहर

कुंडल (ता. पलूस) येथे व्याजाने दिलेले पैसे परत न दिल्याच्या कारणावरून एकावर चाकूने हल्ला करून जखमी केल्याची घटना शनिवारी घडली. श्रीकांत शामराव माने (वय 32) असे जखमीचे नाव आहे.  त्यानंतर दोन गटांत हाणामारी झाली. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. दोन्ही गटाच्या 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

कुंडल पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, फिर्यादी श्रीकांत माने याने दिलेल्या फिर्यादीनुसार गावातीलच उमेश लक्ष्मण हेंद्रे याने  माने याला 10 हजार रुपये व्याजाने दिले होते. हेंद्रे पैसेे परत मागण्यासाठी आला होता. यावेळी वादावादी सुरू झाली. हेंद्रेने चिडून माने याच्या पाठीत चाकूने वार केला. त्यात माने हा जखमी झाला. तसेच लक्ष्मण तुकाराम हेंद्रे, महेश लक्ष्मण हेंद्रे, अनिकेत चंद्रहार हेंद्रे, दीपक मधुकर हेंद्रे, ओंकार जनार्दन हेंद्रे, सुमीत चंद्रहार हेंद्रे  (सर्व रा. कुंडल)  यांनी माने याला  लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले. 

उमेश हेंद्रे याने दिलेल्या फिर्यादीनुसार वडील लक्ष्मण हेंद्रे यांच्याकडे बघून माने याने शिवीगाळ केली. तसेच त्यांच्या अंगावर धावून गेला. याचा उमेश याने माने याला जाब विचारला असता श्रीकांत शामराव माने, राजाराम माने, सुनिल राजाराम माने, महादेव माने, वैभव रघुनाथ सावत  (सर्व रा. कुंडल)  यांनी उमेशला काठीने डोक्यात मारले. तसेच लाथाबुक्यांनी मारहाण केली. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक जयश्री पाटील व हवालदार एस. एस. महाडिक करीत आहेत.