Sat, Jul 20, 2019 13:13होमपेज › Sangli › मुलीचा विनयभंग करून पित्याला मारहाण

मुलीचा विनयभंग करून पित्याला मारहाण

Published On: Jun 25 2018 1:52AM | Last Updated: Jun 25 2018 12:25AMतासगाव : शहर प्रतिनिधी

तासगाव तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलगी क्‍लासवरून परत येत असताना एकाने तिला वाटेत अडवून तिचा विनयभंग केला. याचा जाब विचारणार्‍या मुलीच्या पित्याला तसेच आजोबांना चौघांनी खोर्‍याने बेदम मारहाण केली. याप्रकरणी तासगाव पोलिसांत चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रदीप उर्फ सोन्या लालासाहेब चव्हाण, लालासाहेब बापू चव्हाण, प्रफुल्‍ल लालासाहेब चव्हाण, रुपेश धोंडीराम चव्हाण अशी संशयितांची नावे आहेत.

तासगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी : शनिवारी पीडित मुलगी दुपारी सायकलवरुन घरी चालली होती. यावेळी प्रदीप याने तिला अडविले आणि तिचा विनयभंग केला. घरी सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. मुलगी घरी आल्यानंतर तिने वडिलांना हा प्रकार सांगितला. दुसर्‍या दिवशी वडील प्रदीपच्या घरी जाब विचारण्यासाठी गेले असता प्रदीपसह त्याचे वडील लालासाहेब, त्याचा भाऊ प्रफुल्‍ल व चुलत भाऊ रुपेश यांनी त्यांना शिवीगाळ करून खोर्‍याने मारहाण करण्यास सुरूवात केली.