Sun, Jul 21, 2019 06:09होमपेज › Sangli › अल्पवयीन मुलीचे अपहरण करून विनयभंग, एकाला अटक

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून विनयभंग, एकाला अटक

Published On: Apr 24 2018 1:07AM | Last Updated: Apr 23 2018 11:41PMसांगली : प्रतिनिधी

शहरातील एका अल्पवयीन मुलीला लातूरला आजीकडे सोडण्याचे  आमिष दाखवून तिला मोटारसायकलवरून नेऊन परत आणून सोडण्यात आले. यावेळी तिच्याशी अश्‍लील वर्तनही करण्यात आले. याप्रकरणी एकावर अपहरण, विनयभंगासह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. 

अजय उर्फ वासुदेव धनपाल सोनावले (वय 19, रा. हनुमाननगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. 

शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास शंभर फुटी रस्त्यावरून पीडित मुलगी जात असताना अजयसह त्याच्या साथीदाराने तिला अडविले. तिला लातूर येथील तिच्या आजीकडे सोडतो, अशी फूस लावली. त्यानंतर दोघांनीही तिला मोटारसायकलवर (एमएच 10 0886) बसविले.  तिला मोटारसायकलवरून लातूरला नेले. गाडीवरून जाताना तिच्याशी अश्‍लील वर्तन केले. लातूरला आजीच्या घराजवळ पोहोचल्यानंतर आजी आणि मामाला पाहून घाबरून ते पुन्हा पीडित मुलीला घेऊन सांगलीला आले. शनिवारी रात्री साडेसातच्या सुमारास दोघांनीही मुलीला शंभर फुटी रस्ता परिसरात सोडून ते निघून गेले. फिर्यादीनुसार अजय सोनावले याला अटक करून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यातील मोटारसायकलही जप्त करण्यात आली आहे. 

Tags : sangli, minor girl, kidnapping, Molestation, one arrested, sangli news,