Sat, May 30, 2020 00:19होमपेज › Sangli › कडेगावात मोहरमची सांगता भावपूर्ण वातावरणात 

कडेगावात मोहरमची सांगता भावपूर्ण वातावरणात 

Published On: Sep 12 2019 1:57PM | Last Updated: Sep 12 2019 1:39PM

कडेगाव ऐतिहासिक मोहरम ताबुतांच्या जियारत आढावा बैठकीस उपस्थित नागरिक. (छाया : रजाअली पिरजादे)  कडेगाव : शहर प्रतिनिधी 

कडेगाव शहरामध्ये गुरुवार( दि.12) रोजी हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक मोहरम ताबुतांचे विसर्जन करण्यात आले. ऐतिहासिक मोहरम ताबुतांची सांगता अत्यंत भावपूर्ण वातवरणात झाली. यावेळी प्रारंभी मोहरम कमिटी आणि ग्रामस्थांची बैठक संपन्न झाली. यामध्ये ताबुतांचे बांधकाम मजबूत करावे आणि कळसाची उंची नेहमी मर्यादित ठेवावी व मोहरममधीक मेल व कर्बल यांचे अधिक योग्य पद्धतीने नियोजन करून हिंदू-मुस्लिम ऐक्याची परंपरा कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. 

ताबुतांच्या भेटीनंतर तिसऱ्या दिवशी जियारतीचा कार्यक्रम असतो. यावेळी मानाच्या सातभाई ताबूताजवळ ग्रामस्थांची बैठक झाली. त्यामध्ये झालेल्या कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत मोहरममधील विविध विषयावर साधक बाधक चर्चा करण्यात आली. मोहरमला ज्या लोकांनी सहकार्य केले त्यांचे आभार मानण्यात आले. उत्कृष्ट बांधकाम झालेल्या ताबूतांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर पुढील वर्षी उत्सहात मिरवणुका व भेटी घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तबर्रूक (प्रसाद) म्हणून फळे व खजूर वाटप करण्यात आले आणि ताबुतांचे विसर्जन म्हणजे ताबुतांचे मजले वेगवेगळे करून ठेवण्यात आले.

यावेळी गुलाम पाटील, चंद्रसेन देशमुख, सुरेश थोरात, प्रल्हाद देशमुख, विजय शिंदे, संतोष डांगे, युनुस पटेल, हाजी शौकत पटेल, जाफर पाटील, साजीद पाटील, पै.मोहन माळी, उदय देशमुख, राजेंद्र दिक्षित, राजू जाधव, युनुस ईनामदार, मुनीर इनामदार, श्रीरंग माळी, ज्ञानेश्वर शिंदे, रवी देशपांडे, शशिकांत रास्कर, राजेंद्र राऊत, युसूफ बागवान, नासीर पटेल, सिराज पटेल, असिफ तांबोळी, दीपक न्यायणीत यांच्यासह सर्व ताबुतांचे मानकरी, करबलवाले, बुधवार पेठ मेल, शुक्रवार पेठ मेलवाले, ग्रामस्थ मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.