Sat, Mar 23, 2019 01:56होमपेज › Sangli › मोदींनी पाहिला सांगलीतील बेदाणा सौदा

मोदींनी पाहिला सांगलीतील बेदाणा सौदा

Published On: Mar 18 2018 1:06AM | Last Updated: Mar 18 2018 1:06AMसांगली : प्रतिनिधी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतून सांगली मार्केट यार्डात सुरू असलेला बेदाणा सौदा ऑनलाईन पाहिला. राष्ट्रीय कृषी व्यापार (ई-नाम) अंतर्गत पाच राज्यातील पाच बाजार समित्यांमध्ये काढलेल्या ऑनलाईन सौद्याचे थेट प्रक्षेपण मोदी यांनी पाहिले. 

दिल्ली येथे कृषी प्रदर्शनाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शनिवारी भेट दिली. ‘ई-नाम’अंतर्गत स्टॉलला त्यांची विशेष भेट होती. महाराष्ट्रासह 5 राज्यातील 5 बाजार समित्यांमध्ये निघणार्‍या ऑनलाईन सौद्याचा थेट प्रक्षेपण पाहण्याची  व्यवस्था दिल्लीतील स्टॉलवर केली होती. 

सांगली मार्केट यार्डात शनिवारी  सौद्यावेळी बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील, उपसभापती तानाजी पाटील, महाराष्ट्र कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक (आयटी) श्री. लोखंडे, ‘ई-नाम’संदर्भात नियुक्‍त एजन्सीचे अरविंदम् पॉल, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) प्रकाश अष्टेकर, मिरजेच्या उपनिबंधक बागल, पणन कृषी मंडळाचे अधिकारी श्री. फटाकडे, कोल्हापूर विभागीय अधिकारी पवार, जिल्हा पणन अधिकारी श्री. नांगरे, बाजार समितीचे संचालक वसंतराव गायकवाड, जीवन पाटील, अण्णासाहेब कोरे, अभिजीत चव्हाण, कुमार पाटील, दीपक शिंदे, बाळासाहेब बंडगर, रामगोंडा संती, देयगोंडा बिरादार, अजित बनसोडे, सचिव पी. एस. पाटील, उपसचिव एन. एम. हुल्याळकर, सांगली-तासगाव बेदाणा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मनोज मालू, राजेंद्र कुंभार, हार्दिक सारडा, पप्पू मजलेकर, हिंगमिरे, भावेश मजेठिया, बाफना, सुनील हडदरे व अडते, व्यापारी, शेतकरी उपस्थित होते. 

‘ई-नाम’ मध्ये शेतकरी, अडते, व्यापारी यांचे हित आहे, असे प्रतिपादन बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांनी व्यक्त केले. 

शंका, प्रश्‍नांचे निरसन

सौदा संपल्यानंतर बाजार समितीचे पदाधिकारी, अधिकारी, अडते, व्यापारी यांच्यात संवाद झाला. ‘ई-नाम’, ऑनलाईन सौदा यासंदर्भातील शंका, प्रश्‍नांचे निरसन करण्यात आले. सौदे हॉलमध्ये सौदे काढण्याऐवजी अडत्यांच्या दुकानात लॉटनिहाय बेदाणा पाहून ऑनलाईन दर अपलोड करण्याची पद्धत सुलभ व योग्य असल्याचे मत अधिकारी तसेच अडते व्यापार्‍यांनी व्यक्त केले.  

Tags : Modi, raisin, Deal, Online, Watch, Sangli,