Tue, Jul 16, 2019 09:35होमपेज › Sangli › पशुधनावर जागेवर उपचारासाठी मोबाईल व्हॅन

पशुधनावर जागेवर उपचारासाठी मोबाईल व्हॅन

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

जिल्ह्यात पशुधनावर जागेवर उपचार करण्यासाठी ‘अत्याधुनिक मोबाईल व्हॅन’ हा नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहे, असे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी सांगितले. पशुसंवर्धन तसेच आजारी पशुधनावर उपचारासाठी ‘हेल्पलाईन’ सुरू करण्यात येणार आहे, असे उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी सांगितले. 

जिल्हा परिषदेत बुधवारी लोकनेते राजारामबापू पाटील आदर्श गोपालक पुरस्कार प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संग्रामसिंह देशमुख होते. उपाध्यक्ष सुहास बाबर, सभापती अरूण राजमाने, तम्मनगौडा रवि, ब्रह्मदेव पडळकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. व्ही. टी.सावंत उपस्थित होते. गुजरातची ‘अमूल’ ही संस्था तसेच काही कंपन्या जिल्ह्यात दुग्धसंकलनात उतरल्या आहेत. 

दर्जेदार दुधाला मोठी मागणी आणि चांगला दर मिळणार आहे. त्यामुळे दर्जेदार दूध उत्पादन व आदर्श पशुपालन आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जाणार आहे. मुक्त संचार गोठा, मिल्कींग मशीन आदी योजना त्याचाच एक भाग आहे. दुग्धउत्पादन वाढीसाठी जिल्हा परिषद पशुपालकांच्या मदतीला धावणार असल्याचेही देशमुख व बाबर यांनी सांगितले. कृषी व पशुसंंवर्धन विभागाला स्वीय निधीतून झुकते माप दिले जाईल, असे देशमुख यांनी सांगितले. 

आदर्श गोपालक पुरस्कार विजेते पशुपालक : मिरज- आप्पासाहेब मगदूम (लिंगनूर), उमाजी सोनुरे (लिंगनूर). कवठेमहांकाळ- संजय सदामते (देशिंग), चंद्रकांत ओलेकर (कोकळे). जत- मल्लीकार्जुन तळ्ळी (उमदी), चंद्रशेखर पट्टणशेट्टी (शेगाव). आटपाडी- संभाजी जाधव (आटपाडी), विठ्ठल काळे (काळेवाडी). खानापूर- अतुल बाबर (गार्डी), यशवंत चव्हाण. तासगाव- नंदकुमार कांबळे (मांजर्डे), सुधीर भडके (सावळज). वाळवा- हिराबाई माने, संगीता आटुगडे-पाटील (आष्टा). शिराळा- अशोक साळुंखे (निगडी), सुमन माने (सागाव). पलूस- संदीप लाड (कुंडल), भानुदास वरूडे (दुधोंडी). कडेगाव- बाळकृष्ण सावंत (येतगाव),  राजकुमार कणसे (येतगाव).

 

Tags : sangli, sanlgi news, Animals, treatment, Mobile van,


  •