Tue, Jul 23, 2019 02:04होमपेज › Sangli › मुल्लाने यापूर्वीही केले चित्रीकरण

मुल्लाने यापूर्वीही केले चित्रीकरण

Published On: Mar 08 2018 1:49AM | Last Updated: Mar 07 2018 11:15PMसांगली : प्रतिनिधी

येथील प्राची डायग्नोस्टिक सेंटरमधील चेंजिंग रूममध्ये मोबाईल लपवून त्याद्वारे चित्रीकरण केल्याप्रकरणी संशयित समीर मुल्लाकडे पोलिसांनी कसून चौकशी केली. त्याने यापूर्वीही असे चित्रीकरण केल्याची कबुली दिली असून ते डिलीट केल्याचेही पोलिसांना सांगितले. दरम्यान, त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. 

सोमवारी दुपारी एक महिला तपासणीसाठी आल्यानंतर डिस्पोजेबल सिरींज बॉक्समध्ये मोबाईल व्हायब्रेट होताना पीडित महिलेला दिसून आले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याबाबत तातडीने पोलिसांनी समीरला ताब्यात घेऊन अटक केली. त्याच्यावर विनयभंगासह बेकायदा चित्रीकरणाचा गुन्हा सांगली शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. 

मनसेची कारवाईची मागणी

सूरज मुल्ला या कर्मचार्‍याने महिलांचे चित्रीकरण केल्याचे कबूल केले आहे.  त्याची महिला अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मनसेने केली आहे. याबाबत पोलिस उपअधीक्षक अशोक वीरकर यांना  निवेदन देण्यात आले.