Wed, Nov 21, 2018 05:36होमपेज › Sangli › मालगाडी घसरली; महालक्ष्मी, सह्याद्री एक्स्प्रेस रद्द

मालगाडी घसरली; महालक्ष्मी, सह्याद्री एक्स्प्रेस रद्द

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मिरज : प्रतिनिधी

मिरज-पुणे रेल्वे मार्गावर जेजुरीजवळ सोमवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास पुण्याहून मिरजेकडे येणार्‍या रिकाम्या मालगाडीचे 6 डबे रुळावरून घसरले. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. कोल्हापूर-मुंंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस , सह्याद्री एक्स्प्रेस तसेच पाँन्डेंचरी-दादर चालुक्य एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.
पुण्याहून मिरजेकडे रिकामी मालगाडी येत होती.  जेजुरीजवळ मालगाडीचे 6 डबे रुळावरून घसरले.  अपघात नेमका कोणत्या कारणाने झाला हे मात्र समजू शकले नाही. रेल्वेमार्ग सुरळीत करण्याचे काम तत्काळ सुरू करण्यात आले.  मात्र त्यासाठी विलंब लागणार असल्याने  महाराष्ट्र एक्स्प्रेस पंढरपूर, कुर्डुवाडी मार्गे वळविण्यात आली.

कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेसचा मार्ग बदलण्यात आल्याने पुण्याकडे जाणार्‍या प्रवाशांनी आरक्षण रद्द करून तिकीटाचे पैसे मिळावेत म्हणून  सहायक स्टेशन प्रबंधक यांच्या कार्यालयासमोर गर्दी केली होती. तसेच या रेल्वे अपघातामुळे दक्षिणेकडून येणार्‍या हुबळी-कुर्ला, वास्को-निजामुद्दीन गोवा एक्स्प्रेस  या पंढरपूर-कुर्डुवाडी-पुणे अशा वळविण्यात आल्या आहेत. पुण्याहून मिरजकडे येणार्‍या गाड्या कुर्डुवाडी, पंढरपूर मार्गे सोडण्यात आल्या आहेत.

Tags : Miraj, six coaches, goods, train, collapsed, Jejuri Station, mahalaxmi express, sahyadri express, gondia express


  •