Thu, Jul 18, 2019 04:15होमपेज › Sangli › मालगावमध्ये कारच्या धडकेत  मिरज, सुभाषनगरचे दोघे ठार

मालगावमध्ये कारच्या धडकेत  मिरज, सुभाषनगरचे दोघे ठार

Published On: May 23 2018 1:07AM | Last Updated: May 23 2018 12:04AMमिरज : शहर प्रतिनिधी

तालुक्यातील मालगाव येथील एका ढाब्यानजीक भीषण अपघातात दोघे जण ठार झाले. सोमवारी रात्री 1.30 च्या सुमारास दुचाकी व कार समोरासमोर धडकल्याने हा अपघात झाला. अफसर पीरसाहेब पिरजादे (रा. सुभाषनगर, ता. मिरज) व वहिदा शाहिद दर्यावर्दी (वय 36, रा. दर्ग्याजवळ, मिरज) अशी मृतांची नावे आहेत.ओंकार नावाचा तरुण रात्री कार (एमएच 09-बीबी 534) घेऊन मिरजेतून मालगावकडे निघाला होता. त्याच वेळी अफसर हे वहिदा यांच्यासमवेत दुचाकीवरून कार (एमएच 08- डी 68) मालगावकडून मिरजेकडे निघाले होते.

मालगावजवळ  एका ढाब्याजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर टक्‍कर झाली. ती एवढी जोरदार होती, की अफसर हे जागेवरच ठार झाले. वहिदा या गंभीर जखमी झाल्या. दुचाकीचा चक्‍काचूर  झाला. वहिदा यांना मिरजेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. अपघातातील दोन्ही वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.