Sun, Jun 16, 2019 12:09
    ब्रेकिंग    होमपेज › Sangli › मिरजेत खासगी वायरमन लाच घेताना जाळ्यात

मिरजेत खासगी वायरमन लाच घेताना जाळ्यात

Published On: Apr 13 2018 1:19AM | Last Updated: Apr 12 2018 11:56PMमिरज : शहर प्रतिनिधी

येथील एका व्यावसायिकाकडून 200 रुपयांची लाच घेताना मिरजेतील वायरमन रमेश आण्णाप्पा शिंदुरे (वय 43, रा. मगदूम मळ्याजवळ, पंढरपूर रस्ता, मिरज) याला रंगे हाथ पकडण्यात आले. 
तक्रारदार यांचे मिरजेतील महात्मा गांधी चौकामध्ये घड्याळ दुरुस्तीचे दुकान आहे. त्यांनी त्यांच्या दुकानामध्ये फर्निचर दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. त्या कामासाठी विजेचे मीटर बाजूला बसवायचे होते. ते काम शिंदुरे यांना त्यांनी सांगितले. 

या कामासाठी चारशे रुपये लागतील. त्यापैकी 200 रुपये वीज कंपनीत भरावे लागतील व उर्वरित 200 रुपये लाच म्हणून द्यावे लागतील, असे त्याने सांगितले. काम केल्यानंतर 200 रुपयांची लाच त्याने मागितली. 

आज दुपारी गांधी चौकामध्ये  ते पैसै देण्यासाठी शिंदुरे यांना बोलविण्यात आले. तेथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील राऊत, चंद्रकांत गायकवाड, अविनाश सागर, सुनील कदम, संजय कलगुटगी, संजय संकपाळ, श्रीपती देशपांडे, बाळासाहेब पवार यांनी ही कारवाई केली.

Tags : sangli news Miraj Private Wireman, take,  bribe,