Thu, Nov 15, 2018 13:56होमपेज › Sangli › मिरजेत ईद उत्साहात, नमाज पठण

मिरजेत ईद उत्साहात, नमाज पठण

Published On: Jun 16 2018 10:47PM | Last Updated: Jun 16 2018 10:23PMमिरज : प्रतिनिधी

शहरात रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी दर्ग्यात नमाज पठण झाले. नंतर  ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण करण्यात आले. मिजाज अहमद मुश्रीफ यांनी नमाज पठण व ब्रहानुद्दीन खतीब यांनी खुदबा व दुवा पठण केले. यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना  शुभेच्छा दिल्या. नमाज पठणसाठी 30 ते 40 हजार मुस्लिम बांधव उपस्थित होते. मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष खा. संजय पाटील, प्रदेश जनता दलाचे अध्यक्ष माजी आमदार प्रा. शरद पाटील, पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, उपअधीक्षक धीरज पाटील, प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, तहसीलदार शरद पाटील, समित कदम, विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील, प्रा. सिध्दार्थ जाधव, गजेंद्र कुल्लोळी, आरिफ चौधरी, जुबेर चौधरी, अकबर मोमीन, प्रमोद इनामदार, प्रकाश इनामदार, अ‍ॅड. अमित शिंदे, जैलाब शेख, मनोहर कुरणे उपस्थित होते. शहरात विविध मशिदीमध्ये नमाज पठण झाले.