Sat, Feb 23, 2019 14:11होमपेज › Sangli › केरळला रेल्वेने पिण्याचे पाणी 

केरळला रेल्वेने पिण्याचे पाणी 

Published On: Aug 18 2018 8:24PM | Last Updated: Aug 18 2018 8:24PMमिरज : प्रतिनिधी 

गेल्या काही दिवसांपासून पडत मुसळधार मुसळधार पावसामुळे केरळमध्ये पूरस्‍थिती निर्माण झाली आहे. केरळचा बहुतांशी भाग पाण्याखाली गेला आहे. यामुध्ये शेती ,घरे, रस्‍ते पाण्याखाली गेल्‍याने येथील जनजीवन विस्‍क्‍ळीत बनले आहे.

त्‍यातच या ठिकानची लाईट आणि पाणी पुरवठ्‍याची व्यवस्‍थाही प्रभावित झाल्‍याने नागरिकांना पिण्याच्या पाण्याची प्रचंड मोठी टंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्‍था करण्यासाठी  रेल्वे बोर्ड आणि केंद्र शासनाच्या आदेशानुसार गुजरात मधील रतलाम येथून 14 व्यागन आणि महाराष्ट्रातील पुणे येथून 15 व्यागन मधून 14 लाख 50 हजार लिटर शुध्द पिण्याचे पाणी केरळच्या दिशेने रवाना करण्यात आले आहे.

या गाडीस सुपरफास्ट एक्स्प्रेसचा दर्जा देण्यात आला असून, ही गाडी दौंड, वाडी मार्गे केरळ मधील तिरुअनंतपुरमकडे रवाना झाली आहे.