Tue, Jul 16, 2019 21:45होमपेज › Sangli › सदस्यांवरील पोलिस कारवाईवरुन खडाजंगी

सदस्यांवरील पोलिस कारवाईवरुन खडाजंगी

Published On: Dec 09 2017 1:46AM | Last Updated: Dec 08 2017 11:18PM

बुकमार्क करा

मिरज : प्रतिनिधी

काँग्रेस सदस्यांविरोधात पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्या संदर्भात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी काळ्या फिती लावून निषेध केला.सभापती जनाबाई पाटील यांच्या अध्यक्षस्थानी होत्या. या विषयावरून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप सदस्यांमध्ये खडाजंगी झाली. काँग्रेसचे अनिल आमटवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक 
मोहीते यांच्यासह दोन्ही पक्षाच्या सदस्यांनी पंचायत समितीच्या शेती 

कार्यालयासमोर शेतकर्‍यांसह केलेल्या या आंदोलनासाठी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या मुद्यावरुन प्रशासनाचा त्यांनी निषेध केला.  कारवाई मागे घेण्याची मागणी केली आहे. भाजपचे किरण बंडगर, विक्रम पाटील यांच्यासह सदस्यांनी कारवाईचे समर्थन केले. उपसभापती काकासाहेब धामणे यांनी आंदोलन करण्यापूर्वी प्रशासनाला निवेदन देऊन सूचना द्यायला हवे होते असे सांगितले. 
 आमटवणे  म्हणाले, प्रशासकीय कामात आम्ही कोणताही अडथळा आणला नाही. कोणाला दमदाटी केली नाही. केवळ शेतकर्‍यांसाठी शेतीपूरक अवजारे मिळावीत अशी आमची मागणी होती. कार्यकर्त्यांवर  राजकीय दबावाखाली पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. 

 भाजप सदस्यांनी आंदोलनापूर्वी परवानगी का घेतली नाही, असा प्रतिप्रश्‍न केला. त्यामुळे दोन्ही सदस्यांमधील वाद वाढत गेल्याने उपसभापती धामणे यांनी या प्रकरणात मध्यस्थी करीत योग्य तो तोडगा काढू असे सांगितले. पंचायत समिती प्रशासनाला हाताशी धरुन एक व्यक्ती राजकीय दबाव आणत असल्याने  गुन्हे दाखल करण्याची कृती चुकीची असल्याचे सदस्यांनी  सांगितले. यावेळी 
आमटवणे यांच्यासह अशोक मोहिते, कृष्णदेव कांबळे, अजयसिंह चव्हाण, किरण बंडगर, विक्रम पाटील, राहुल सकळे, रंगराव जाधव यांनी परस्पर विरोधी आक्रमक भूमिका घेतली.