Thu, Apr 25, 2019 13:40होमपेज › Sangli › विनापरवाना सात डिजिटल प्रिंटींग मशीन सील

विनापरवाना सात डिजिटल प्रिंटींग मशीन सील

Published On: Jan 21 2018 2:54AM | Last Updated: Jan 21 2018 12:22AMमिरज : प्रतिनिधी

महापालिकेने शहरातील सात डिजिटल प्रिटिंग मशिनरी सील करण्याची कारवाई शनिवारी केली. संबंधित डिजिटल व्यावसायिकांनी महापालिकेचा व्यवसाय परवाना घेतलेला नव्हता. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. अ‍ॅट्रॅक्टीव्ह प्रिंट ग्राफीक (जवाहर चौक, मिरज), उगारे आर्ट्स (शनिवारी पेठ), एस. एम. उगारे (चर्च रोड), सचिन ग्राफीक (गवळी कट्टा), यश डिजिटल (लक्ष्मी मार्केट जवळ), डायमंड डिजिटल (शहर बस स्टँड जवळ) आणि वक्रतुंड डिजिटल (देवल कॉम्प्लेक्स) यांचा समावेश आहे.

उपायुक्त स्मृती पाटील, सहाय्यक आयुक्त संभाजी मेथे, आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र ताटे, डॉ. संजय कवठेकर व कार्यालय अधीक्षक ए.डी.राजमाने यांनी ही कारवाई केली. शहरात विनापरवाना डिजिटल लावण्यात येत आहेत. महापालिकेने अनेकवेळा कारवाई करुनही परवानगीविना अनेक ठिकाणी डिजिटल बोर्ड लावण्यात येत आहेत. महापालिकेने शहरातील सर्व डिजिटल व्यावसायिकांचे  परवाने तपासले. त्यावेळी त्यांच्या डिजिटल व्यवसायाचे परवाने नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे डिजिटल मशिनरी सील करण्याची कारवाई करण्यात आली आहे.