Mon, Nov 12, 2018 23:31होमपेज › Sangli › ‘सांगली फर्स्ट’जिल्ह्याला अव्वल बनवेल

‘सांगली फर्स्ट’जिल्ह्याला अव्वल बनवेल

Published On: Feb 25 2018 1:14AM | Last Updated: Feb 24 2018 11:00PMसांगली : प्रतिनिधी

दर्जेदार शेती उत्पादने, विविध नामवंत व्यवसायांची सांगली जिल्हा खाण आहे. त्यांचे ब्रँडिंग करणारी ‘सांगली फर्स्ट’सारखी प्रदर्शने जिल्ह्याला देशात अव्वल बनवतील, असे मत पालकमंत्री तथा सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्‍त केले. येथील वालचंद महाविद्यालय क्रीडांगणावर आयोजित सांगली फर्स्ट प्रदर्शनास त्यांनी भेट  दिली. त्यावेळी ते बोलत होते.

जिल्ह्यातील विक्रमी शेतीउत्पादन करणारे  शेतकरी, कारखानदार, यांचा देशमुख यांच्या हस्ते  सन्मान करण्यात आला. संयोजक खासदार संजय पाटील, दीपक शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख उपस्थित होते.

देशमुख म्हणाले,  येथील उत्पादित बेदाणा, हळद, गूळ आदींपासून भाजीपाल्यापर्यंत विविध  उत्पादनांना देशात मोठी मागणी आहे. यशस्वी उद्योजक सतीश मालू, संजय दांडेकर आणि शशिकांत आवटे,  नारायण म्हेत्रे,संजय बरगाले , जयसिंग चव्हाण , श्रीनिवास भोसले, सचिन संख,  आनंदराव पाटील,मनोज लिमये, प्रशांत पाटील , रुपेश पाटील, आनंद दुधाळ,उत्तम शिंदे,पंकज निकम,हिंदुराव देशमुख, संदीप गायकवाड या शेतकर्‍यांचा सन्मान करण्यात आला.