Sun, May 26, 2019 10:36होमपेज › Sangli › आरोग्य योजनांच्या माहितीसाठी केंद्र सुरू करा

आरोग्य योजनांच्या माहितीसाठी केंद्र सुरू करा

Published On: Jan 08 2018 1:15AM | Last Updated: Jan 07 2018 11:05PM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

महात्मा फुले आरोग्य योजनेची माहिती लोकांपर्यंत पोहोचवा. त्याचा जास्तीत - जास्त लाभ लोकांना झाला पाहिजे. या योजनेत निकषांमुळे जे नागरिक येऊ शकणार नाहीत, त्यांच्यासाठी सांगलीत एक केंद्र सुरू करा. आरोग्य सुविधा आणि मदतीपासून एकही नागरिक वंचित राहणार नाही, याकडे लक्ष द्या, असे आवाहन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले. 

खासदार संजय पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त येथील गणेशनगरमधील रोटरी सभागृहात मोफत आरोग्य शिबिर आयोजित केले होते. त्यावेळी ते बोलत होते. खासदार पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार दिनकर पाटील, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष डी. के. पाटील, शेखर इनामदार आदी उपस्थित होते. 

ना. पाटील म्हणाले, अचानक आजार उद्भवल्यानंतर रुग्णांसमोर उपचारांवरील खर्चाचा मोठा प्रश्‍न निर्माण होतो.  अनेकांना शासनाच्या योजना माहीत नसतात. माहीत असल्यातरी काही अटीमुळे त्यांचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे पैशासाठी कोणीही उपचारांपासून वंचित राहू नये, यासाठी काळजी घ्या. पक्षातर्फे माहिती देणारे एक केंद्र सुरू करा. अनेक रुग्णांना पुणे, मुंंबई येथे उपचारासाठी घेऊन जावे लागते. त्यावेळी त्यांच्या नातेवाईकांना राहण्याची व्यवस्थाही करून देण्यात आली आहे. खासदार पाटील म्हणाले, या आरोग्य योजनेत बहुसंख्य आजारांचा समावेश केला आहे. या योजनांचा जास्तीत - जास्त लाभ सामान्यांना देण्यासाठी  प्रयत्न करण्यात येईल.