Sat, Jul 20, 2019 10:48होमपेज › Sangli › दूधदरासाठी उत्पादक आक्रमक 

दूधदरासाठी उत्पादक आक्रमक 

Published On: Jul 17 2018 1:36AM | Last Updated: Jul 16 2018 7:52PMमांजर्डे : वार्ताहर

दूध उत्पादनातील तोटा यापुढे सहन केला जाणार नाही, असा सणसणीत इशारा देत दुधाला प्रतिलिटरमागे 5 रुपयांची दर वाढ देण्याची मागणी आरवडे येथे दूध उत्पादकांनी केली आहे. सोमवारपासूनच्या दूध बंद आंदोलनात सक्रिय सहभागी होण्याचे यावेळी आवाहन करण्यात आले.  सोमवारपासूनच्या दूध बंद आंदोलनात दूध घालणार नाही आणि कोणाला घालू देणार नाही, असा निर्धार यावेळी करण्यात आला. तासगाव  तालुक्याच्या पूर्व भागातील दूध उत्पादकांची आरवडे येथे व्यापक बैठक झाली.  दूध दराच्या आंदोलनाबाबत चर्चा करण्यात आली.  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष जोतिराम जाधव प्रमुख उपस्थित होते. ते म्हणाले,  शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे आज दूध उत्पादक देशोधडीला लागला आहे. दुधाचे दर पाडल्यामुळे उत्पादकांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे. सतत तोटा सहन करण्यापेक्षा उत्पादकांनी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला साथ द्यावी,  सरकारला दुधाला दरवाढ द्यावीच लागेल. मात्र काहीजण या आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे, त्यांना थारा देऊ नका. 

दुधाला प्रतिलिटर 5 रु. दरवाढ घेतल्याशिवाय माघार घेणार नसल्याचा इशारा देतानाच त्यांनी  तालुक्यातून एक थेंबही दूध बाहेर जाऊ देणार नाही, यासाठी स्वाभिमानीच्यावतीने  आक्रमक आंदोलन करा, असे सुनावले.ते म्हणाले, तालुक्यातील दूध उत्पादक, शेतकर्‍यांनी एक होऊन खासदार राजू शेट्टी यांच्या आंदोलनास साथ द्यावी. तालुक्यातील दूध संकलन करणार्‍या संस्था व खासगी डेअरी चालकांनी दूध उत्पादकांच्या आंदोलनास पाठिंबा द्यावा, असे त्यांनी यावेळी आवाहन केलेे.