Fri, Jul 19, 2019 19:52होमपेज › Sangli › साखरेप्रमाणे दूध व्यवसायालाही पॅकेज मिळेल : सदाभाऊ खोत

साखरेप्रमाणे दूध व्यवसायालाही पॅकेज मिळेल : सदाभाऊ खोत

Published On: Jun 19 2018 1:25AM | Last Updated: Jun 18 2018 10:57PMइस्लामपूर : वार्ताहर

केंद्र सरकारने ऊस उत्पादकांसाठी जाहीर केलेल्या ऐतिहासिक साडेआठ हजार कोटींच्या पॅकेजमुळे ऊस उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे. याच पॅकेजप्रमाणे लवकरच केंद्र सरकार दूध व्यवसायासाठीही पॅकेज देईल, त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार असल्याचे कृषी व पणन राज्यमंत्री ना. सदाभाऊ खोत यांनी पत्रकार बैठकीत सांगितले. 

ना. खोत म्हणाले, मुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रयत्न केल्यामुळे व पंतप्रधान मोदी यांच्यासमोर सविस्तर मांडणी केल्याने साखर व्यवसायासाठी साडेआठ कोटीचे पॅकेज मिळाले. एवढेच नव्हे तर स्वातंत्र्यापासून आजअखेर साखरेची किंमत कधीही ठरली नव्हती. ती आता 29 रुपये निश्‍चित करण्यात आली आहे. शेतकर्‍यांच्यादृष्टीने हा ऐतिहासिक निर्णय आहे. त्यामुळे साखरेचे भाव आता 2700 रुपयांवरून 3300 रुपयांपर्यंत गेले आहे. 

‘महानंद’ला ब्रॅण्ड निर्माण करता का आला नाही?

राज्य सरकार सहकारी दूध संघ मोडीत काढून अमूलला येथे दूध संकलनास वातावरण निर्मिती करीत असल्याच्या विनायक पाटील यांच्या आरोपावर बोलताना ना. खोत यांनी महानंदलाही अमूल, आनंद प्रमाणे आपला ब्रॅण्ड निर्माण करता आला असता. महानंदावर आजपर्यंत कोणाची सत्ता होती. त्यांना हे का जमले नाही.