Tue, Mar 19, 2019 11:21होमपेज › Sangli › म्हैसाळचे उन्हाळी आवर्तन  लवकरच : मुख्यमंत्री 

म्हैसाळचे उन्हाळी आवर्तन  लवकरच : मुख्यमंत्री 

Published On: Feb 27 2018 1:57AM | Last Updated: Feb 26 2018 11:48PMमिरज : शहर प्रतिनिधी

मिरज पूर्व भागातील शेतकर्‍यांना वरदान ठरलेल्या म्हैसाळ योजनेचे उन्हाळी आवर्तन लवकरच सुरू करण्यात येईल. शेतकर्‍यांना पाणी देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे, अशी माहिती आमदार सुरेश खाडे यांनी दिली.खासदार संजय पाटील यांच्यासह त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती.

ते म्हणाले, म्हैसाळ योजनेचे वीजबिल वसूल करण्या संदर्भात गावोगावी बैठका घेऊन प्रबोधन करणे सुरू आहे. परंतु त्यामुळे आवर्तनास विलंब होत आहे. सध्या मिरज पूर्व भाग, तासगाव, कवठेमहांकाळ, जत व सांगोला येथे पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न गंभीर झाला आहे.  पाणी सोडणे गरजेचे आहे.  

म्हैसाळ योजनेचे वीजबिल 12 ते 15 कोटी रुपये थकित आहे. ते  टंचाई निधीमधून तरतूद भरून  तातडीने पाणी द्यावे अशी मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे केली. त्यामुळे  उन्हाळी आवर्तन सुरू करण्याकरता आदेश देण्याचे त्यांनी  मान्य केले.  यावेळी माजी मंत्री एकनाथ खडसे उपस्थित होते