Tue, Apr 23, 2019 09:44होमपेज › Sangli › म्हैसाळच्या पाण्यासाठी मिरजेत सर्वपक्षीय मोर्चा

म्हैसाळच्या पाण्यासाठी मिरजेत सर्वपक्षीय मोर्चा

Published On: Feb 28 2018 1:12AM | Last Updated: Feb 27 2018 8:33PMमिरज : प्रतिनिधी

म्हैसाळ योजनेची थकबाकी टंचाई निधीतून भरून योजना सुरू करा, या मागणीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, जनता दल, शिवसेना यांच्यावतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

किसान चौकातून काढण्यात आलेल्या मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज शिंदे, बाळासाहेब होनमोरे, काँग्रेसचे पं. स. सदस्य अनिल आमटवणे, तालुकाध्यक्ष अण्णासाहेब कोरे, प्रा. सिद्धार्थ जाधव यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चात बाजार समिती सभापती दिनकर पाटील, आप्पासो हुळ्ळे, प्रा. प्रमोद इनामदार, संजय ऐनापुरे, दिलीप बुरसे, चंद्रकांत मैगुरे, संजय काटे, बी. आर. पाटील, वसंतराव गायकवाड, सुभाष खोत यांच्यासह तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नायब तहसीलदार के. बी. सोनवणे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

म्हैसाळ योजनेचे पाणी दि. 8 मार्चपर्यंत सोडण्यात यावे, अन्यथा दि. 13 मार्चरोजी रास्तारोको आणि दि. 20 मार्चपासून सर्वपक्षीय उग्र आंदोलन करण्याचा इशारा तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. यावेळी आ. सुरेश खाडे यांच्या विरोधात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. खोटी आश्‍वासने देणार्‍या आमदारांवर कारवाई करा, अशी मागणी केली आहे.