Wed, May 22, 2019 16:28होमपेज › Sangli › पुण्याच्या परिषदेला निम्म्या सदस्यांची दांडी

पुण्याच्या परिषदेला निम्म्या सदस्यांची दांडी

Published On: Jan 19 2018 1:56AM | Last Updated: Jan 18 2018 9:02PMसांगली : प्रतिनिधी

73 वी घटनादुरुस्ती रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त पुणे विभागातील पाच जिल्हा परिषदांचे पदाधिकारी, सदस्य, पंचायत समिती सभापतींची एक दिवशीय विभागीय परिषद बुधवारी पुणे येथे झाली. या परिषदेला सांगली जिल्हा परिषदेच्या निम्म्या सदस्यांनी दांडी मारली. 

पुणे येथे यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) येथे गुरूवारी विभागीय परिषद झाली. या परिषदेला जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, सदस्य, पंचायत समितींचे सभापती यांना निमंत्रित केले होते. स्थानिक स्वराज्य संस्थांची स्वायत्ता, त्यांची कार्ये, त्यांचे शासनाशी संबंध व भूमिका, स्थानिक स्वराज्य संस्थांना 73  व्या व 74 व्या घटनादुरुस्तीने दिलेले स्थान, त्यांचे अस्तित्व, त्यांना प्राप्त झालेला दर्जा व महत्व, महिला पदाधिकारी यांची भूमिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उत्पन्नाचे स्त्रोत या विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन होते. सांगलीतून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख व अन्य पदाधिकारी, पंचवीस सदस्य, पंचायत समितींचे सभापती उपस्थित होते. 

73 व 74 वी घटनादुरुस्ती स्थानिक स्वराज्य संस्थांसंदर्भात महत्वाची आहे. या घटनादुरुस्तीच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित परिषद महत्वाची होती. या परिषदेत सदस्यांना आपली मतेही प्रकर्षाने मांडता आली असते. मात्र निम्म्या सदस्यांनी या परिषदेला दांडी मारून अनास्था दर्शवली. विशेष म्हणजे पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सातारा जिल्हा परिषद सदस्यांची उपस्थिती सांगली जिल्हा परिषद सदस्यांहूनही कमी होती.